New Hero HF Deluxe Launched: प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ही केवळ भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी नाही तर जगातील सर्वात मोठी स्कूटर आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. Hero Motocorp ने स्वस्त आणि चांगल्या प्रोडक्शनच्या आधारे भारतातील तसेच जगभरातील दुचाकी बाजारात सर्वाधिक ओळख निर्माण केली आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हीरोचाच दबदबा आहे, त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत हीरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता कंपनीने भारतीय वाहन बाजारात मोठा धमाका केलाय.

Hero ने आपल्या लोकप्रिय बाईकला दिलाय असा दमदार अपडेट की, बजेट रेंजमध्ये ही बाईक गेमच बदलून टाकेल. किंमत ऐकून विश्वास बसणार नाही… पण फीचर्स पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, एवढ्यात एवढं सगळं? मायलेजपासून लूकपर्यंत सगळंच जबरदस्त, बाजारात Hero HF Deluxe Pro ची एंट्री झालीय, पण हे ‘Pro’ टायटल साधं नाही… यात लपलेत अनेक भन्नाट गोष्टी…

हीरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय आणि बजेट फ्रेंडली बाइक HF Deluxe ला अपग्रेड करत नवीन Hero HF Deluxe Pro लाँच केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये फक्त लूकच नव्हे तर इंजिनपासून ते फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. कॉम्पॅक्ट बाईक सेगमेंटमध्ये जबरदस्त मायलेज आणि तगड्या फीचर्ससह येणारी ही बाईक ग्राहकांना खूपच भुरळ घालू शकते.

Hero HF Deluxe Pro बाईकमध्ये काय आहे नवीन?

नवीन HF Deluxe Pro मध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत. यात नवीन बॉडी ग्राफिक्स, LED हेडलॅम्प आणि क्राउन-शेप हाय इंटेन्सिटी पोजिशन लॅम्प देण्यात आले आहेत, जे रात्रीच्या वेळी अधिक चांगली व्हिजिबिलिटी देतात.

यासोबतच, शार्प एज्ड ग्राफिक्स बाईकला मॉडर्न आणि स्पोर्टी लूक देतात. क्रोम एक्सेंट्स आणि डिजिटल स्पीडोमीटर ही Premium Touch वाढवतात. यामध्ये लो फ्युएल इंडिकेटर ही सुविधा दिली गेली आहे, जी राइडिंगच्या वेळी उपयुक्त ठरते.

टायर्स, ब्रेक्स आणि सस्पेन्शन

या बाईकमध्ये १८ इंच डायामीटरचे ट्यूबलेस टायर्स दिले गेले आहेत, जे समोर आणि मागील बाजूस लागू आहेत. ब्रेकिंगसाठी कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम आणि मागील बाजूस १३०mm ड्रम ब्रेक दिला आहे. फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस दोन स्टेप अ‍ॅडजस्टेबल सस्पेन्शन हे राइडिंग अनुभव अधिक आरामदायक बनवतात.

इंजिन आणि मायलेज

Hero HF Deluxe Pro मध्ये ९७.२cc चा सिंगल सिलिंडर इंजिन दिला आहे, जो ८००० RPM वर ७.९ bhp ची पॉवर आणि ६००० RPM वर ८.०५ Nm टॉर्क जनरेट करतो. यामध्ये Hero चं विशेष i3S (Idle Stop-Start System), लो फ्रिक्शन इंजिन आणि कम रोलिंग रेजिस्टन्स टायर्स दिले गेले आहेत, जे केवळ मायलेजच नव्हे तर परफॉर्मन्ससुद्धा वाढवतात.

काय आहे किंमत?

ही नवीन बाईक भारतीय बाजारात Bajaj Platina, TVS Sport आणि Honda Shine 100 यांसारख्या लोकप्रिय 100cc बाईक्सशी थेट स्पर्धा करणार आहे. या सर्व बाईक्स त्यांच्या किफायतशीर किमती आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखल्या जातात. अशा परिस्थितीत HF Deluxe Pro ही ग्राहकांसाठी एक नवा आणि दमदार पर्याय म्हणून समोर येते. Hero HF Deluxe Pro ची एक्स-शोरूम दिल्लीमध्ये सुरुवातीची किंमत ७३,५५० रुपये इतकी आहे. ही बाईक आता देशभरातील Hero MotoCorp डीलरशिपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.