जेव्हापासून सानिया मिर्झाने टेनिसमध्ये उत्तम कामगिरी केली तेव्हापासून भारतातील लोक टेनिसचे चाहते झाले आहे पण, त्याआधीही बरेच लोक टेनिस पाहायचे आणि त्यांना आवडले होते. टेनिसशी संबंधित सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा बॉल, जो बनवणे सोपे नाही. टेनिस बॉल बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि याचा पुरावा म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला फॅक्टरीमधील व्हिडिओ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@smartest.worker या इंस्टाग्राम अकांउटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये फॅक्टरीत टेनिस बॉल बनवले जात आहेत हे दिसत आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट मशिनद्वारे बनवली जाते, त्यामुळे आता चेंडूही देखील मशीनमध्ये तयार केला जातो. व्हिडीओमध्ये फॅक्टरीमध्ये टेनिस बॉल करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे जी पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. एक बॉल तयार करण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते हे पाहून लोक थक्क झाले आहेत.

असा बनवला जातो टेनिस बॉल…

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रथम रबर मशीनद्वारे टाकून सपाट केला जात आहे आणि नंतर त्याचे लहान तुकडे केले जातात. कापल्यानंतर, ते गोल खोबणीत घातले जाते आणि नंतर त्यावर मशिनमध्ये दाब देऊन त्याला बॉलचा आकार दिला जातो. यानंतर, हे गोल कवच बाहेर काढले जात आहे आणि प्रत्येकाला वर्तुळाकार व्यवस्थित कापले जाते. ते लहान अर्ध वतुळाकार कवच वेगळे केले जात आहेत आणि नंतर दोन कवच एकत्र जोडले जात आहेत. यानंतर चेंडूवर पिवळे कापड लावल्यानंतर त्यावर पांढऱ्या रेषा लावल्या जात आहेत. त्या पांढऱ्या रेषा चिकटलेल्या भागाला लपवण्यासाठी आहेत असे असे सांगितले जाते, पण हा व्हिडिओ पाहून असे वाटते की त्या रेषा केवळ डिझाइनसाठी बनवल्या आहेत.

हेही वाचा – Gulab Jamun Latte: तुम्ही कधी गुलाबजाम कॉफी प्यायली आहे का? नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा

हेही वाचा – “एवढी घाई कशासाठी!” पैसे काढण्यासाठी स्कूटरवर बसून थेट एटीएमध्ये घुसला व्यक्ती; व्हायरल फोटो पाहून आवरेना हसू

नेटकरी म्हणाले, “एका बॉलसाठी एवढी मेहनत”

या व्हिडिओला २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की “टेनिस बॉल बनवण्यासाठी एवढी मेहनत करावी लागते याची त्याला कल्पना नव्हती.” दुसऱ्याने सांगितले की ठआपण फक्त अंतिम परिणाम पाहतो, परंतु त्यामागील कठोर परिश्रम आपल्याला माहित नाहीत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is a tennis ball made the entire process shown in the factory video just watch it snk