Kitchen jugad video: गॅससमोर कित्येक वेळ उभं राहून चपाती बनवायची असतं. त्यावेळी घामानं अक्षरशः भिजायला होतं. चपाती नकोशीच वाटते. पण आता तुम्हाला दररोज चपाती बनवण्याची गरज नाही. सासूच्या कामांना कंटाळून एका सुनेनं जबरदस्त किचन जुगाड केलाय. तुम्हाला फक्त एकदाच चपाती बनवायची आहे आणि त्यानंंतर चपाती बनवण्याची झंझटच संपेल. गोल, मऊ आणि पातळ चपात्या तयार करणं काही सोपं काम नाही. कित्येक वर्षांचा सराव केल्यानंतर चपाती करण्याची कला प्राप्त होते असं म्हणतात. कारण चपाती हा एक वेळखाऊ पदार्थ आहे. आधी पीठ व्यवस्थित मळा, मग त्याचे लहान लहान गोळे करा, त्यांना लाटा आणि शेवटी चपाती भाजा. या संपूर्ण प्रोसेसमध्ये काही चूक झाली तर चपातीचा पापड झालाच म्हणून समजा. त्यामुळे काही जण भाजी घरी तयार करतात पण चपाती मात्र हॉटेलमधून विकत घेतात. मात्र या समस्येवर एका महिलेनं भन्नाट तोडगा शोधून काढला आहे. तिनं चपाती करण्याची अशी एक टेकनिक शोधून काढलीये की अगदी नवखा माणूस सुद्धा एका मिनिटांत ४ ते ५ चपात्या सहज तयार करून दाखवेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर या सुनेला तिच्या सासुने घरातल्यांसाठी चपाती बनवायला सांगितल्या तेव्हा या सुनेनं असं काही जुगाड लावला की काही मिनिटात तिच्या चपात्या करुन झाल्या आणि उरलेल्या वेळात ती पुन्हा आपला फोन वापरु लागली.आता तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे? चपाती करणं हे खूप अवघड आहे आणि त्याला खूप वेळ देखील जातो. शिवाय आकार देखील त्याचा बरोबर गोल येत नाही. मग अशात या सुनेनं कसं काय? जुगाड लावला असेल?

तर या महिलेनं संपूर्ण पीठ एकाच वेळी लाटून घेतलं. मग एका वाडग्याच्या मदतीनं गोल छापे मारले. आणि एका झटक्यात ४ चपात्या तयार केल्या. मग या चपात्या एकाच वेळी तव्यावर भाजल्या. आणि शेवटी एक एक चपाती उचलून तिला गॅसवर फायनल टच दिला. अशा प्रकारे या महिलेनं केवळ २ ते ३ मिनिटांत ४ चपात्या तयार करून दाखवल्या.

पाहा व्हिडीओ

हा चपाती तयार करण्याचा जुगाड _hetals_art या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ९ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या महिलेचं कौतुक केलं आहे. कारण चपाती तयार करण्यासाठी तिनं एक उपयोगी जुगाड दाखवलाय. त्यामुळे काही जण तिला स्मार्ट बहुराणी म्हणतायेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make roti quickly desi jugaad video viral on social media srk