बस प्रवास हा दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण बसची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीमध्येच प्रवास करावा लागतो. बीआरटीएस बस सेवा सुरु झाल्यानंतर नव्या बस रस्त्यावर दिसू लागल्या. या बसचे दरवाजे स्वयंचलित असतात आणि त्याचे नियंत्रण चालकाच्या हातात असते. या दरवाज्यातून चढ उतर करणे अनेकदा धोकादायक ठरते कारण दरवाजे अचानक बंद होतात ज्यामुळे कधी प्रवाशांची बॅग तर कधी कधी खुद्द प्रवासी या दरवाज्यात अडकतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका प्रवाशाचा पाय दरवाज्यात अडकला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते कीक एका बीआरटीएस बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाय दरवाज्यामध्ये अडकलेला दिसत आहे. प्रवाशाचा पाय अडकला असूनही बस भरधाव वेगाने धावते आहे. प्रवाशाची सुटका करण्यासाठी चालक कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही हे अत्यंत धक्कादायक आहे. व्हिडीओच्या शेवटी बीआरटीएस बसचा बसस्टॉप दिसत आहे पण हा प्रवासी आधीच्या बसस्टॉपपासून तसाच शांतपणे उभा असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर khushbu_journo नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सुरत बीआसटीएसमधील एका घटनेमध्ये एका प्रवाशाचा पाय बसच्या दरवाज्यात अडकला पण दचालकाने दरवाजा उघडला नाही ज्यामुळे प्रवाशाची गैरसोय झालीच शिवाय त्याचा जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागला. व्हिडिओ व्हायरल होत आहे. “

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “चालकाला कोणत्या प्रकाराचा अंहकार आहे , माणुसकी मेली आहे.

दुसऱ्याने कमेंट केली की, गरीबाचे कोणीही नसते,”

तिसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, “चालकाला पकडा आणि पोलिसांकडे सोपवा”

पाचव्याने कमेंटमध्ये लिहिले की, “चालकाचे लायसन्स रद्द करा”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humanity is dead passengers leg gets stuck in the door driver did not stop the busshocking incident video goes viral snk