Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर आणि काळजी दिसून येते. सोशल मीडियावर जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्वांसमोर नवरा बायकोच्या शूजची लेस बांधताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल नवरा असावा तर असा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बायकोच्या शूजची लेस निघालेली असते तेव्हा कुणाचीही पर्वा न करता नवरा खाली बसून बायकोच्या शूजची लेस बांधून देतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवरा बायकोच्या नात्यातील हे प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : संस्कार असावे तर धोनीसारखे! स्वत:आजीजवळ जाऊन बसला धोनी अन् फोटो काढला, माणूसकीचे दर्शन घडवणारा VIDEO व्हायरल

huskyindia0_family या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझा जेंटलमॅन”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप भाग्यवान आहात.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband tie lace of shoes of his wife video goes viral husband wife relation ndj