Trending News: काम करताना कर्मचाऱ्यांनी कशाचाही विचार करू नये अशी साधारण प्रत्येक कंपनीची इच्छा असते. पण तीच गोष्ट कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याच्या दिवशी मात्र लागू होत नाही. अगदी सुट्टीच्या दिवशीही नेहमी ऑफिसच्या ग्रुपवर तुम्ही ऍक्टिव्ह राहावं, लागेल ते काम करावं अशी अपेक्षा केली जाते. याहून गंभीर बाब म्हणजे कंपनीच्या मालकांना, तुमच्या बॉसला किंवा अगदी तुमच्यासारख्याच अन्य कर्मचाऱ्यांनाही यात काही चूक वाटत नाही. अशी लोकं उलट तुम्हालाच तुम्ही सुट्टी घेताय म्हणजे काही चूक करताय असं भासवून देतात. मात्र आता ड्रीम ११ या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना स्वप्नवत वाटेल असा नियम आणला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑनलाईन क्रीडा प्लॅटफॉर्म ड्रीम ११ कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी “ड्रीम 11 अनप्लग” नावाचे धोरण स्वीकारले आहे. या “UNPLUG” धोरणांतर्गत, कंपनीचे कर्मचारी कार्यालयीन कामकाज, संबंधित संभाषणे (ईमेल, व्हॉट्सअॅप ग्रुप, स्लॅक किंवा कॉल्सवर) पासून एका आठवड्यासाठी कोणत्याही दबावाशिवाय पूर्णपणे रजा घेऊ शकतात. यात अन्य सहकाऱ्यांचे कॉल उचलून उत्तर देण्यास सुद्धा हे कर्मचारी बांधील नसतील.

लिंक्डइन पोस्टमध्ये, कंपनीने UNPLUG धोरणाविषयी माहिती देत सांगितले की, “Dream11 वर, आम्ही ‘Dreamster’ म्हणजेच कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी सर्व संभाषणातून मुक्त करतो. ड्रीम्सटर ब्रेकवर असताना त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही याची खात्री केली जाते. निदान सुट्टीच्या दिवशी प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवणे किंवा फक्त सुट्टीत आराम करणे यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण मूड व उत्पादकता वाढू शकते.

CNBC च्या वृत्तानुसार, ड्रीम 11 चे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनीसांगितले की, “UNPLUG” कालावधीत जर कंपनीतील अन्य सहकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला तर त्याला/तिला 1 लाख रुपये दंड भरावा लागेल. अगदी टॉप बॉसपासून नवशिक्यापर्यंत, प्रत्येकजण दरवर्षी एका आठवड्यासाठी कंपनीच्या सिस्टममधून साइन आउट करू शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If any co worker calls or text for work on leave will have to pay 1 lakh fine ipl sponsor company rule show your boss svs