वैतागलेल्या महिलेनं बॉसवर काढला राग; पुढे बॉसने जे केलं ते पाहून म्हणाल वाहह…

Don’t be in bad mood : एका महिलेने तिच्या बॉससंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, हे पाहून तुम्हीही म्हणाल बॉस असावा तर असा!

Irregular Periods
पीरियड्स उशिरा येतात का? (Photo-pixabay)

सध्याच्या धकाधकीच्या जिवनात लोक इतके व्यस्त असतात की, त्यांना स्वत:ला देण्यासाठी आजिबात वेळ नसतो. घरचं काम आणि ऑफिसमधील काम या सगळ्यांमध्ये लोक खूपच व्यस्त असतात. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आणि लोक बऱ्याचदा आजारी पडतात. कामाचा त्रास माणसांना शारिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारे हानी पोहोचवतं. दरम्यान पूर्वी मानसिक आरोग्याविषयी इतके उघडपणे बोलले जात नव्हते मात्र आता अधिकाधिक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि आरोग्याचा विचार करतात. अशाच एका कंपनीच्या बॉसची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे. एका महिलेने तिच्या बॉससंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, हे पाहून तुम्हीही म्हणाल बॉस असावा तर असा!

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

बॉस असावा तर असा !

स्तुती राय या ट्विटर युजरने एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये तिने तिचं आणि तिच्या बॉसमधलं संभाषण लिहलं आहे. तर झालं असं की तिचा बॉस तिला कामासाठी फोन करतो, मात्र ती फोन उचलत नाही. त्यानंतर बॉस तिला कॉल करण्यासाठी मेसेजदेखील करतो. मात्र ती कामामुळे थकलेली असल्यामुळे मला बोलायचं नाही असं उत्तर मेसेजद्वारे बॉसला देते. यावर आता तुम्ही विचार करत असाल की बॉस चिडला असणार. किंवा आता तिची नोकरी धोक्यात येणार.मात्र यापैकी काहीही झालेलं नसून तिच्या बॉसचा रिप्लाय पाहून तुम्हीही नक्कीच चकीत व्हाल. तिच्या बॉसने तिला मेसेज करत तुझे जे काही काम असेल ते मला दे आणि तू ३, ४ दिवसांची सुट्टी घे असा सल्ला दिला. तसंच वाईट मूडमध्ये राहू नकोस असंही म्हणाले.

पाहा पोस्ट –

हेही वाचा – viral: बंगळुरुमधील सोसायटीच्या भलत्याच अटी; बॅचलर्सना रात्री १० नंतर…

यावर स्तुती म्हणते यालाच आपण हेल्थी वर्क कल्चर म्हणतो. या पोस्टला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले असून त्या बॉसचे नेटकरी खूप कौतूक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 10:41 IST
Next Story
फ्रीज शिवाय कुल्फी! काकूंचा जुगाड पाहून आनंद महिंद्राही थक्क; Video पाहून म्हणाल, “बाईचं डोकं काय चालतं”
Exit mobile version