बंगळुरूमध्ये अनेक मजेशीर तर कौतुकास्पद आणि काही आश्चर्यचकित घटना रोज घडत असतात. बंगळुरूचे अनोखे रिक्षाचालक, ट्रॅफिकदरम्यानच्या मजेशीर गोष्टी तसेच ओला, उबर (Ola and Uber) वाहतूक कंपन्यांचे कमी भाडे घेणे, एका दिवसात भाड्याचे घर मिळणे आदी अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आज या यादीत आणखीन एका गोष्टीचा समावेश होणार आहे. पण, ही गोष्ट अगदीच अनोखी आणि भावुक करणारी आहे. बंगळुरूमध्ये मित्राच्या घरी गेलेला एक व्यक्ती स्वतःच्या घरी येत असतो. पण, रस्त्यात त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल संपते, तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्याची मदत करण्यास धावून येतो.

बंगळुरूमध्ये रात्री बाराच्या सुमारास कोरमंगला येथील मित्राच्या घरून अज्ञात व्यक्ती सर्जापूर रोडवरून घरी परतत होता आणि अचानक व्यक्तीची दुचाकी बंद पडली, त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले आहे असे त्याला समजले. व्यक्ती जिथे उभा होता तिथून पेट्रोलपंप २.५ किलोमीटर लांब होते. तरीसुद्धा व्यक्ती त्याची बाईक सुरू होतेय का याचा प्रयत्न करत होता. तितक्यात स्विगी (Swiggy) फूड कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय तिथे आला आणि त्याने व्यक्तीला काय झाले दादा असे विचारले ? तर घडलेला सर्व प्रकार व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला सांगितला.त्यांनर माणुसकीच्या नात्याने डिलिव्हरी बॉय व्यक्तीची गाडी पेट्रोल पंपाजवळ घेऊन जायला मदत करतो.

हेही वाचा…मुंबईत रिक्षासाठी लागली प्रवाशांची भलीमोठी रांग; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

पोस्ट नक्की बघा :

यादरम्यान व्यक्तीने तुला कुठे डिलिव्हरी द्यायला जायचे आहे का, असे विचारले. त्यावर डिलिव्हरी बॉय हो जायचे तर आहे, पण मी आधी तुम्हाला पेट्रोलपंपपर्यंत सोडतो असे म्हणाला. त्यानंतर ते एका पेट्रोल पंपजवळ पोहचतात, पण ते बंद असते. त्यानंतर व्यक्ती डिलिव्हरी बॉयला ५०० रुपये घेण्यास सांगतो आणि धन्यवाद म्हणतो. पण, डिलिव्हरी बॉय म्हणतो, मला पैसे नको, मी तुम्हाला पुढच्या तीन किलोमीटरवर असणाऱ्या एका पेट्रोलपंपजवळ सोडतो. त्यानंतर काही वेळात दोघे पेट्रोलपंप जवळ पोहचतात आणि व्यक्तीच्या दुचाकीत पेट्रोल भरून घेतात. तर तो व्यक्ती त्याला धन्यवाद म्हणतो आणि पुन्हा एकदा पैसे घेण्यास सांगतो. तेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणतो, ‘आज तुम्ही आहात, कदाचित तुमच्या जागी उद्या मी असेन; आज मी तुम्हाला मदत केली, उद्या मला कोणीतरी मदत करेल.’ हे ऐकून व्यक्ती अगदीच भावुक होतो आणि ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवतो.

तसेच व्यक्ती या सगळ्या गडबडीत डिलिव्हरी बॉयला त्याचे नाव विचारण्यास विसरतो. पण, एक गोष्ट आवर्जून पोस्ट मध्ये सांगतोय की, यापुढे मी स्विगीवर कोणतीही गोष्ट ऑर्डर करेन तेव्हा त्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयला मी नक्की टीप देईन; असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @Shravantickoo या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. डिलिव्हरी बॉयसोबत व्यक्तीने एक सेल्फी पोस्ट केला आहे आणि घडलेला प्रसंग पोस्टमध्ये लिहून त्याने आभार व्यक्त केले आहेत.