India On Pakistan Allegation Of Nuclear Leakage Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारत-पाकिस्तान तणावादरम्यान काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. यात असाच एक फोटो व्हायरल होतोय, जो पाकिस्तानच्या किराना हिल्सजवळील असल्याचा दावा केला जात आहे, तसेच यात अमेरिकन ऊर्जा विभागाचे किराना हिल्समध्ये रेडिएशन गळतीच्या संशयानंतर पाहाणी करत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. पण, खरंच असं काही घडलं का याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ….

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @Meghnad_Lanka याने काही लोक एका जागेची पाहणी करतानाची दृश्ये शेअर केली आहे.

इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह तेच फोटो शेअर करत आहेत.

तपास :

सोशल मीडिया युजर्सनी शेअर केलेल्या फोटोंवर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

फोटो १ :

२०१२ मध्ये अपलोड केलेल्या ब्लॉगमध्ये आम्हाला पहिला फोटो आढळून आला.

सेमीपॅलाटिंस्क अणुचाचणी केंद्राला भेट दिल्याबद्दल कार्ल विलिस जॉइंटचा हा ब्लॉग होता.

फोटो २ :

आम्हाला आढळले की हा फोटो budapsttimes.hu ने अपलोड केला आहे.

Kazakhstan shows way to a safer world by its own example

कॅप्शनमध्ये म्हटले आहे : आता बंद असलेल्या सेमीपलाटिंस्क अणुचाचणी केंद्रावरील एक बोगदा.

२०२१ मध्ये अपलोड केलेल्या या लेखात अनेक फोटो होते, ज्याच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, ३० वर्षांपूर्वी कझाकिस्तानच्या लोकांनी अणुशस्त्रांपासून मुक्त जगाच्या बाजूने एक मूलभूत निवड केली होती. २९ ऑगस्ट १९९१ रोजी कझाकिस्तान प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्रपती एल्बासी एनए नजरबायेव यांनी आदेश देत, सेमीपलाटिंस्क अणुचाचणी केंद्र बंद केले.

फोटो ३:

हा फोटो abc.net.au ने त्यांच्या लेखात वापरला होता.

https://www.abc.net.au/news/2015-08-13/the-polygon-a-nuclear-guide-to-the-kazakhstan-steppe/6694834

फोटोच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे : सोव्हिएत काळातील अणुचाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जाणारा एक भूमिगत बंकर. (एबीसी न्यूज : के जॉन्सन)

सेमीपॅलाटिंस्क अणुचाचणी केंद्र किंवा ‘द पॉलीगॉन’ हे कझाक मैदानावर पसरलेले १८,००० चौरस किलोमीटरचे क्षेत्र आहे, जिथे सोव्हिएत युनियनने १९९१ मध्ये चाचणीसाठी साइट अधिकृतपणे बंद करण्यापूर्वी ४५६ अणुचाचण्या केल्या होत्या.

आज, पॉलीगॉन हे चाचण्यांच्या आसपासच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन करण्याचे ठिकाण आहे आणि ते पर्यटनासाठीदेखील खुले आहे.

निष्कर्ष :

कझाकिस्तानमधील सेमीपॅलाटिंस्क अणुचाचणी केंद्राचे जुने फोटो आता पाकिस्तानमधील किराना हिल्समधील अलीकडील असल्याचा दावा करून शेअर केले जात आहेत, त्यामुळे या व्हायरल फोटोंचा अलीकडील भारत-पाकिस्तान तणावाशी काहीही संबंधित नाही; त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.