दिवाळीनिमित्त ऑफिसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान सर्व जण पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटतात. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. दिवाळीनिमित ऑफिसमध्ये पूजा असते. ऑफिसमध्ये आलेल्या एका जर्मनी सहकाऱ्यासाठी भारतीय कर्मचारी कुर्ता-पायजमा ऑनलाइन ॲपमधून ऑर्डर करतात आणि एक पोस्ट शेअर करतात. या ऑनलाइन ॲप कंपनीचा सीईओ या पोस्टला अगदीच खास रिप्लाय देतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीनिमित्त ऑफिसमध्ये पूजा आयोजित केलेली असते. ऑफिसमध्ये सगळ्यांनीच पारंपरिक पोषाख परिधान केलेले असतात. त्यानिमित्त जर्मनीचा सहकारी भारतात येऊन ऑफिसला भेट देतो आणि दिवाळीच्या या खास सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतो. तेव्हा सगळ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केलेले पाहून त्याला आश्चर्य वाटते.जर्मन कर्मचाऱ्याला कल्पना नसते की, ऑफिसमध्ये दिवाळीनिमित्त पूजा असते. त्यामुळे कंपनीचे सर्व भारतीय कर्मचारी मिळून ‘ब्लिंकिट’वरून (Blinkit)वरून जर्मनी कर्मचाऱ्यासाठी खास कुर्ता-पायजमा ऑर्डर करतात आणि खास अनुभव शेअर करतात.

हेही वाचा… हाताखाली बसचे स्टेअरिंग अन् लक्ष मोबाईलमध्ये; अशी जीवघेणी ड्रायव्हिंग कधी पाहिली आहे का? पाहा Video

पोस्ट नक्की बघा :

जर्मन सहकाऱ्यासाठी ऑर्डर केला कुर्ता-पायजमा :

ऑफिसच्या कर्मचाऱ्याने जर्मनी सहकाऱ्याचे फोटो शेअर करीत लिहिले की, जर्मनीतील सहकाऱ्याने आज भारताच्या ऑफिसला भेट दिली. दिवाळीनिमित्त सर्वांनी पारंपरिक कपडे घातलेले पाहून ते आश्चर्यचकित झाले. तसेच ऑफिसमध्ये प्रत्येकाला असे वाटत होते की, जर्मनीच्या सहकाऱ्यांनी कुर्ता-पायजमा घालावा. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘ब्लिंकिट’ (Blinkit)वरून १० मिनिटांच्या आतमध्ये सहकाऱ्यासाठी ऑर्डर केलेल्या कपड्यांची डिलिव्हरी करण्यात आली, असे त्याने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

तसेच या पोस्टने ‘ब्लिंकिट’चे सीईओ अलबिंदर धिंडसा यांचेही लक्ष वेधले गेले आणि त्यांनी ही पोस्ट रिट्वीट करून लिहिले की, आम्ही तुमची मदत करू शकलो याचा आम्हाला आनंद झाला. ‘ऑफिसच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कुर्ता न घालण्याचे आता कोणतेही कारण उरलेले नाही’, अशी मजेशीर कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @DebarunT यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच जर्मनी सहकाऱ्याने त्याचा पारंपरिक पोशाख परिधान केलेला एक सुंदर फोटोदेखील शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian employees ordered kurta pajama for german colleague after seeing post ceo of the company reacted asp