TVS New Scooter Launched: भारतीय ऑटो मार्केटमध्ये नेहमीच हाय मायलेज दुचाकींची मागणी असते. TVS हे भारतातील गाजलेले नाव आहे. भारतातील आघाडीची टू-व्हीलर ऑटोमोबाईल कंपनी TVS मोटर भारतीय बाजारपेठेत दुचाकींच्या विस्तृत श्रेणीची विक्री करते, ज्यामध्ये बाईक आणि स्कूटरचा समावेश आहे. या कंपनीच्या वाहनांना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी देत असलेल्या भन्नाट फीचर्समुळे या गाड्यांची विक्री जास्त प्रमाणात होते. भारतीय दुचाकी बाजारात कमी किमतीच्या आणि जास्त मायलेज असलेल्या वाहनांना जास्त मागणी आहे. या मालिकेत आता टीव्हीएस मोटर कंपनीने आणखी एका नव्या स्कूटरला बाजारात सादर करून मोठा धमाका केलाय. दुसऱ्या कंपन्यांना थेट टक्कर देण्यासाठी तयार झालेलं हे वाहन आता नव्या जनरेशनचं ‘ड्रीम मशीन’ बनणार आहे, असं स्पष्ट होतंय. चला तर जाणून घेऊया कंपनीनं कोणती नवी दमदार स्कूटर आणली आहे.
कंपनीनं देशातील स्पोर्ट स्कूटर म्हणजेच TVS NTORQ 150 नुकतीच लाँच केली आहे. या नव्या स्कूटरला १४९.७cc चं एअर-कूल्ड O3CTech इंजिन मिळालं आहे. हे इंजिन ७,००० rpm वर तब्बल १३.२PS पॉवर आणि ५,५००rpm वर १४.२Nm टॉर्क देतं. विशेष म्हणजे् केवळ ६.३ सेकंदांत ० ते ६० किमी./ताशीचा वेग पकडणं ही या सेग्मेंटमधील सर्वांत वेगवान कामगिरी मानली जात आहे. तिचा अत्युच्च वेग तब्बल १०४ किमी/ताशी इतका आहे.
सुरक्षा आणि नियंत्रण
त्यामध्ये ABS, Traction Control व स्पोर्ट-ट्यून्ड सस्पेन्शन दिलं गेलं आहे. दोन मोड्स – Street आणि Race मोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हलके अलॉय व्हील्स याला अधिक स्थिरता देतात.
डिझाईन आणि स्टाईल
या स्कूटरचं डिझाईन स्टेल्थ एअरक्राफ्टपासून प्रेरित आहे. नेकेड हँडलबार, एरोडायनॅमिक विंगलेट्स, मल्टिपॉइंट प्रोजेक्टर हेडलॅम्प्स व ‘T’ आकाराची टेललाइट्स यांमुळे ही स्कूटर अधिक फ्युचरिस्टिक दिसते. कलर्ड अलॉय व्हील्स, स्पोर्टी एग्झॉस्ट व सिग्नेचर मफलर साऊंड यांमुळे ती जनरेशन Z साठी खास आकर्षण ठरणार आहे.
टेक्नॉलॉजी आणि कनेक्टिव्हिटी
यात गेमिंग कन्सोलपासून प्रेरित हाय-रेझ TFT क्लस्टर देण्यात आलं आहे. तब्बल ५० हून अधिक कनेक्टेड फीचर्स, Alexa व स्मार्टवॉच इंटिग्रेशन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हेईकल ट्रॅकिंग आणि ‘लास्ट पार्क्ड लोकेशन’सारखी हटकी वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. इतकंच नव्हे, तर कॉल, मेसेज व सोशल मीडिया अलर्ट्सही या स्कूटरवर पाहता येतात.
कंपनीची प्रतिक्रिया
टीव्हीएस मोटर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, “ही नवी राईड म्हणजे केवळ स्कूटर नसून परफॉर्मन्स, डिझाईन व टेक्नॉलॉजी यांचा उत्तम असा मिलाफ आहे. तरुणाईला रेसिंग इन्स्पायर्ड परफॉर्मन्ससोबत हाय-टेक फीचर्स देणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.”
किंमत
TVS NTORQ 150 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.१९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.