Viral video: नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा अन्यथा त्या नात्याला अर्थ उरत नाही. पण हे माहित असताना देखील काही लोकं सर्रास विवाहबाह्य संबंध ठेवतात. विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. हे प्रकार जेव्हा समोर येतात तेव्हा प्रामाणिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोठा धक्का असतो. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात हे प्रकार वाढलेले दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय. मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका ४० वर्षीय पुरूषाने आपल्या पत्नीचे एका जिम ट्रेनरसोबत कथित विवाहबाह्य संबंध असल्याचे कळताच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने एक हृदयद्रावक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ४ पानांची सुसाईड नोट लिहून पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर मानसिक छळ आणि विश्वासघात केल्याचा आरोप केला.
सुदैवाने, त्या पुरूषाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली आणि सध्या तो ठीक आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे आणि पोलिसांनी ही सुसाईड नोट पुरावा म्हणून जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे नाव दिनेश मिश्रा असे आहे, तो एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. दिनेशने आपल्या सुसाईड नोटमध्ये त्याची पत्नी आणि तिचा कथित प्रियकर आणि स्थानिक जिम ट्रेनर मोहम्मद मकसूद खान यांना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.त्याने असा दावा केला की त्याची पत्नी जिथे काम करत होती त्याच जिममध्ये ती जायला लागल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. दिनेशने सांगितले की त्याच्याकडे दोघांमध्ये वारंवार रात्री उशिरा फोन आणि पैसे ट्रान्सफर करण्याचे पुरावे आहेत.
“आरोपीने त्याचा धर्म लपवला” असा आरोप
दिनेश मिश्रा याने असाही आरोप केला की, जिम ट्रेनरने त्याच्या पत्नीशी जवळीक साधण्यासाठी त्याचा धर्म लपवला. “मकसूद खानमुळे माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे,” असे त्याने लिहिले, भावनिक ताण आणि अपमानामुळे त्याला हे पाऊल उचलण्यास कसे भाग पाडले हे स्पष्ट केले.
पाहा व्हिडीओ
दिनेशने असेही नमूद केले की, तो छळाबद्दल तक्रार करण्यासाठी अनेक वेळा पोलिसांकडे गेला होता परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पोलिसांनी आता तक्रारी मिळाल्याची पुष्टी केली आहे आणि यामध्ये कोणते अधिकारी सहभागी होते आणि कोणती कारवाई करण्यात आली याचा आढावा घेत आहेत. त्याने असेही म्हटले की, त्याच्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत ज्यात त्याची पत्नी रात्री उशिरा घराबाहेर पडताना आणि दिनेशला खोलीतून बाहेर पडण्यास सांगताना खानला व्हिडिओ कॉल करत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि पुरावा म्हणून व्हिडिओ आणि सुसाईड नोट दोन्ही गोळा केले आहेत. वरिष्ठ अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.