नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठा चिकन मटणासाराखंच खेकडाही जीव की प्राण असतो. खेकडा खाण्याची एक वेगळीच पद्धत असते, नॉनव्हेजप्रेमी तो बरोबर चवीने खातात. तुम्हीही आतापर्यंत खेकडे खाल्लेच असतील, कधी घरी तर कधी हॉटेलात. याची किंमत फार फार तर किती १०००, २००० इतकी असू शकते, मात्र सिंगापूरमध्ये याच खेकडा डिशची किंमत ५७ हजार इतकी आहे. विश्वास बसत नाही ना, पण हे खरंय. सिंगापूरमध्ये फिरायला गेलेल्या एका महिलेला खेकड्याच्या डीशचं एवढं बिल पाहून धक्काच बसला, एवढचं नाहीतर यानंतर तिने चक्क पोलिसांत धाव घेतलीय. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंगापूरला भेट देणाऱ्या एका जपानी पर्यटक महिलेला एका खेकड्याच्या डिशची किमंत एकून धक्का बसला आहे. जंको शिन्बा नावाच्या पर्यटकाने निराशा व्यक्त करत असा दावा केला की ऑर्डर देण्यापूर्वी तिला डिशच्या किंमतीबद्दल पुरेशी माहिती मिळाली नव्हती. अनपेक्षित खर्चामुळे आपली फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार केली आहे.

शेवटी काय झालं?

जंको शिबाने सिंगापूरमधील सीफूड पॅराडाईजला भेट दिली होती. तिने हॉटेलमध्ये वेटरचा सल्ला घेतला आणि खेकड्याच्या डिशची ऑर्डर दिली. मात्र यावेळी त्यांनी ही किंमत सांगितली नव्हती, मात्र दुसरीकडे हॉटेल मालकानं असा दावा केला आहे की, डिशची किंमत “स्पष्टपणे सांगितली गेली आहे.” दरम्यान शेवटी, प्रकरण वाढल्यानंतर एकूण बिलावर $107.40 ची सूट देण्यात आली.

हेही वाचा >> अविश्वसनीय! गरूडानं उडवला कोल्ह्याच्या तोंडातला घास; शिकारीचा असा थरारक VIDEO कधीच पाहिला नसेल…

आपल्याकडे खवय्यांची कमी नाही, खवय्ये खाण्यासाठी कुठेही पोहचू शकतात, आणि कितीही पैसे खर्च करु शकतात, मात्र कधी कधी व्यावसायीक त्यांच्या फायद्यासाठी नको तेवढ्या किंमती सांगतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese woman files complaint after singapore eatery charges rs 56k for crab dish srk