Ramayana Jatayu Viral Video: रामाणातला एक महत्त्वाचा प्रसंग किंवा महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे जटायू. सीताहरणाच्या वेळी रावणााला विरोध करण्यायास सरसावलेला पक्षी म्हणजे जटायू. रावणाबरोबरच्या युद्धात त्याचा अंत होतो. आजपर्यंत तुम्ही रामायणातच जटायू पक्ष्याबद्दल ऐकलं असेल. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला एका दगडावर एक मोठे गिधाड उभे असल्याचे दिसत आहे.या अनोख्या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक महाकाय पक्षी शांत स्थितीत उभा असल्याचे दिसून येते. हा पक्षी लोकांना रामायणातील ‘जटायु’ या वीर पात्राची आठवण करून देत आहे.याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

रस्त्यावरुन जाणारे लोक या दुर्मिळ पक्ष्याचे फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थांबले, ज्यामुळे हा व्हिडीओ आता चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा पक्षी प्रत्यक्षात गिधाडाची एक दुर्मिळ प्रजाती, अँडियन कॉन्डोर आहे.जे दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये आढळतात.सहसा असे पक्षी मानवी गर्दीपासून दूर राहतात, परंतु या व्हिडिओमध्ये दिसणारा पक्षी केवळ रस्त्याच्या कडेलाच उपस्थित आहे असे नाही तर त्याला गर्दीचा अजिबात त्रास होत नाही असे दिसते. त्याचे शांत वर्तन आणि मोठा आकार पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत..

रामायणात जटायू हा एक शूर गिधाड होता जो सीतेचे रक्षण करण्यासाठी रावणाशी लढला होता. या कारणास्तव, अनेकांनी या महाकाय पक्ष्याला ‘जटायूचा अवतार’ म्हणायला सुरुवात केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे.काही लोकांनी आदरपूर्वक त्याचे वर्णन रामायण काळाशी केले, तर काहींनी ते निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानला.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @swetasamadhiya नावाच्या या वापरकर्त्याने शेअर केला आहे. ही पोस्ट २ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि हजारो लोकांनी ती लाईक केली आहे आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘असे दिसते की रामायण युग परत येत आहे.” मग दुसऱ्याने म्हटले, ‘हे भारतात आढळत नाहीत.’ तिसऱ्याने लिहिले, ‘हे अगदी रामायणातील जटायूसारखे दिसते.’