Jemimah Rodrigues dance video: भारतीय महिला क्रिकेटमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज हे नाव आधीपासूनच ओळखीचं होतं, पण आता ते नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरलं गेलं आहे. महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय जेमिमाच्या अफलातून खेळीमुळे शक्य झाला. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर तिने जे साध्य केलं, त्याने फक्त भारतीय क्रिकेटप्रेमींचंच नाही तर प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला. क्रिकेटच्या मैदानात आक्रमक फलंदाजी करुन जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत जेमिमाने नाव कोरलं आहे. पण तिच्याकडे असलेले उत्तम गुण तमाम चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले आहेत. गोलंदाजांचा समाचार घेण्याबरोबरच चाहत्यांचं मनोरंजन करण्यातही जेमिमा माहीर आहे.
अशातच तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये तिनं असं काही केलंय की तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. जेमिमाची ही दुसरी बाजू बघून तुम्हीही शॉक व्हाल सोबतच तिचं कौतुकही कराल.
आता तुम्ही म्हणाल जेमिमा रॉड्रिग्जनं असं केलंय तरी काय? तर मुंबईकर जेमिमानं चक्क मैदानात अचानक गुलाबी साडी गाण्यावर मैदानात भन्नाट डान्स केलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल एवढं नक्की. मैदानात गाणं वाजताच जेमिमाने जबरदस्त डान्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जेमिमाने वेगवेगळे डान्स मुव्ज सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनाही जेमिमाचा डान्स पाहून चिअर अप केलं.चाहत्यांनीही हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केला.
पाहा व्हिडीओ
जेमिमच्या वादळी खेळीमुळे भारताला आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. या सामन्यातील शतकी खेळीनंतर रॉड्रिग्ज महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामन्यात शतक करणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. जेमिमासाठी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धा फार चढउतारांची राहिली. जेमिमाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये ती फेल ठरली. यानंतर जेमिमाला प्लेईंग इलेव्हनमधून ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात तिला पुन्हा संधी मिळाली आणि तिने ७६ धावांची नाबाद खेळी करत आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवला. तोच फॉर्म कायम ठेवत जेमिमा सेमीफायनल सामन्यात उतरली आणि तिने उत्कृष्ट खेळी केली.
