सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल अशी मेहुणी नको रे बाबा..कारण या मेहुणीने चक्क आपल्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला किस केलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरा नवरी बसलेले दिसत आहे. स्टेजवर खूप लोक उपस्थित आहेत.यावेळी नवरीची बहिण येते तिला पाहून नवरदेव तिला त्याच्या शेजारी बसण्यास सांगतो. यावेळी त्यांच्यामधील मस्करीमध्ये अचानक मेहुणी नवरदेवाला किस करते.हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर लोकही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग X वर शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर अनेकांनी हे शेअरही केले आहे. तर सोशल मीडियावर हे लग्न नंतर मोडलं अशा चर्चा आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ट्रक आणि शाळकरी रिक्षाची जोरदार धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली अन्…अपघाताचा थरारक VIDEO व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘इंटरेस्टिंग व्हिडिओ.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘फक्त हा दिवस पाहायचा बाकी होता.’ त्याचवेळी तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे काय चालले आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jija sali kiss video went viral on internet users reacted watch viral kiss video srk