Jyoti Malhotra Fact Check Video Viral : लाईटहाऊस जर्नलिझमला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळून आले आहे. या फोटोसह असा दावा करण्यात आला आहे की, लोकसभा सदस्य व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह दिसणारी ती महिला यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आहे, जिला नुकतेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. पण, या फोटोमागचं नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर अरुण यादवने व्हायरल फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, ती महिला यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आहे.

इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह हा फोटो शेअर करीत आहेत.

तपास :

व्हायरल झालेल्या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

आम्हाला अनेक वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये मूळ फोटो आढळून आला; पण मूळ फोटो थोडा वेगळा होता. मूळ फोटोत अखिलेश यादव यांच्यासह त्यांची पत्नी डिंपल दिसत आहेत.

https://www.ndtv.com/india-news/akhilesh-yadav-on-stage-with-wife-dimple-father-mulayam-a-no-show-so-far-1651373
https://www.business-standard.com/article/politics/sp-manifesto-akhilesh-shuns-populism-seeks-pro-development-image-117012400544_1.html

हा फोटो २०१७ मध्ये अखिलेश यादव यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तेव्हाचा आहे.

आम्हाला त्याच कार्यक्रमाचे फोटो Getty इमेजेस या स्टॉक इमेजेस वेबसाइटवरही आढळून आले.

https://www.gettyimages.in/detail/news-photo/uttar-pradesh-chief-minister-akhilesh-yadav-with-his-wife-news-photo/632390888?adppopup=true

कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, लखनऊ, २२ जानेवारी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांच्या पत्नी व लोकसभा खासदार डिंपल यादव यांच्यासह २२ जानेवारी २०१७ रोजी लखनऊमधील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करीत आहेत. या जाहीरनाम्यात लॅपटॉपचे वितरण, कन्या विद्या धन, समाजवादी पेन्शन, पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे बांधकाम आणि पोलिस व महिलांसाठी हेल्पलाइन यांबाबत घोषणा करण्यात आली होती. (छायाचित्र : धीरज धवन/हिंदुस्तान टाइम्सद्वारे गेटी इमेजेस)

आम्ही इनव्हिड टूल्समध्ये उपलब्ध असलेल्या ‘फॉरेन्सिक’ टूलद्वारेही हा फोटो तपासून पाहिला. त्यावेळी मूळ फोटोत डिंपल यादवच्या चेहऱ्यावर एडिटिंग केल्याचे दिसून आले.

निष्कर्ष : यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि सपा नेते अखिलेश यादव यांचा व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. मूळ फोटो २०१७ चा आहे, जो पक्षाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळी काढला गेला होता. त्यावेळी अखिलेश त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यासह दिसले होते. व्हायरल होत असलेला फोटो खोटा आहे.