‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून फेमस असलेली नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. करवीर आणि राधानगरी तालुक्यातील गौतमी पाटीलच्या कारयक्रमांना संमीत नाकारण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आणि आयोजन बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी ही संमती नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात असे कार्यक्रम आयोजित करु नये असं आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुख महेश पंडीत यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे पोलिसांनी?

गौतमी पाटीलचा जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्याला पोलिसांनी संमती दिलेली नव्हती. राशिवाडे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथेही आम्ही परवानगी दिलेली नाही. हे कार्यक्रम रद्द करण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की, संपूर्ण जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु आहे. गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दल रस्त्यावर आहे. ज्या कार्यक्रमांना गर्दी जमते अशा कार्यक्रमांना परवानगी देणं हे आम्हाला शक्य होणार नाही. यापूर्वीचे या कार्यक्रमातले अनुभव लक्षात घेता आम्ही परवानगी नाकारली आहे. या कार्यक्रमाला बंदोबस्त देणं हे तातडीने शक्य नाही त्यामुळे हा निर्णय आम्ही घेतला आहे.कोल्हापूरचं जे नृत्य मंडळ आहे त्यांनीही आम्हाला हीच विनंती केली आहे असंही पंडीत यांनी सांगितलं आहे.

कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळ आणि भांडणाविषयी काय म्हणाली गौतमी?

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं, त्यावेळी गौतमी पाटील म्हणाली, “कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं. कार्यक्रम खूप छान पार पडला. भांडण किंवा मारामारी आजच्या कार्यक्रमात काहीही घडलं नाही. मला नियोजन खूपच आवडलं. माझा कार्यक्रम म्हटलं की गडबड आणि गोंधळ, मारामारी असं होतं असंच सांगितलं जातं. मात्र माझ्या सगळ्याच कार्यक्रमात भांडण, मारामारी असे काही प्रकार होत नाहीत. पण काय होतं त्यावरुनच टार्गेट केलं जातं. मात्र माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही. याआधी जी बातमी समोर आली होती तो माझा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे तसं घडलं. मात्र प्रत्येक कार्यक्रमात असं घडत नाही.”

दोन महिन्यांनी माझा घुंगरु सिनेमा येणार आहे. सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा असं मी आवाहन करते आहे. तसंच एक गाणंही येणार आहे. मात्र ते काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही ते सरप्राईज असणार आहे असंही गौतमी पाटीलने सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur gautami patil kolhapur program cancel in ganesh festival marathi news scj