Viral Video: भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहे. भारतात लग्न संस्कृतीची संकल्पना अनेक काळापासून सुरु झालेली आहे. लग्न म्हणजेच दोन जीवांचं नाही तर दोन कुटुंबाचे एकमेकांशी नातं कायमचे जोडले जातात. तर याचं एक उत्तम उदाहरण एका व्हिडीओत पहायला मिळालं आहे. भारताच्या संस्कृतीची एका कोरियन तरुणीला भुरळ पडली आहे. पंजाबी तरुणासोबत कोरियन तरुणीचं लग्न ठरते आणि यासाठी तिला खास पंजाबी लूक देऊन तयार करण्यात आलं आहे ; जे पाहून तुम्ही देखील नक्कीच कौतुक कराल..
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका कोरियन तरुणीचे लग्न असते. एका रूममध्ये तिचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य आणि मित्र-मैत्रिणी असतात.या सगळ्यात लग्न ठरलेली तरुणी अगदीच अनोख्या रूपात सगळ्यांच्या समोर येते. कोरियन तरुणीने तिच्या लग्नासाठी पंजाबी लूक केलेला असतो. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस, हातात खास लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आणि त्याला शोभतील असे दागिने घातले आहेत. कोरियन तरुणीचा लग्नातील पंजाबी लूक एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून नक्की बघा…
हेही वाचा… ना कधी शाळेत गेली, ना कधी शिक्षण घेतले तरीही फाडफाड इंग्रजी बोलतेय ‘ही’ गावातील महिला, Video Viral
व्हिडीओ नक्की बघा :
कोरियन तरुणीचा पंजाबी लूक :
कोरियन तरुणीचा जोडीदार हा पंजाबी असतो. म्हणून ती लग्नासाठी भारतीय पद्धतीत तयार झाली आहे. तसेच तयार होऊन जेव्हा कोरियन तरुणी बाहेर येते. तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्य चकित होतात. तसेच सर्व सदस्य टाळ्या वाजवतात आणि जोरजोरात ओरडत तिची प्रशंसा करतात. काही जण तरुणीचे कौतुक करत असतात, तर काही जण त्यांच्या मोबाईलमध्ये तरुणीचा फोटो काढून घेत असतात. हे प्रेम पाहून कोरियन तरुणी आनंदित होते. यादरम्यान तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनीसुद्धा भारतीय पारंपरिक पोषाख घातलेला तुम्हाला व्हिडीओत दिसून येईल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @muskanmanhashairstylist आणि @ruhanipuri यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या दोन्ही युजरने या कोरियन तरुणीला या खास पंजाबी लूकमध्ये तयार केलं आहे. तसेच कोरियन तरुणीला पंजाबी लूक अगदीच शोभून दिसतो आहे. तसेच व्हिडीओ पाहून अनेक जण तरुणीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. तर काही जण तरुणीच्या पंजाबी लूकचे विविध शब्दात प्रशंसा करताना दिसून आले आहेत