Viral video: मुलं देवाघरची फुलं, असं आपण नेहमी म्हणतो. कारण- ती नेहमी खरं बोलतात. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लहान मुलांचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. त्यांचा निरागसपणा सगळ्यांनाच भावतो. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सगळीच लहान मुलं अभ्यास न करण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करीत असतात. मात्र, हा चिमुकला तर परिक्षेत नापास झालाय आणि यावेळी सुरुवातीला त्याला आलं होतं, मात्र हे टेंशन क्षणात कसं दूर झालं तुम्हीच पाहा. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर कायमच लहान मुलांचे फनी व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्यातील निरागसता आपण कायमच अनुभवत असतो सध्या अशाच एका चिमुकल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. परिक्षेत नापास झाल्यानंतर त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपण परीक्षेत नापास झाल्याचे सांगतोय. नापास झाल्याने मला टेंशन आलं होतं, पण माझा मित्र लुलेनदेखील नापास झाला. त्यामुळे आता माझं टेश्न थोडं कमी झालंय, असं तो मुलगा व्हिडिओमध्ये बोलतोय. म्हणजेच, त्या मुलाला स्वतः नापास झाल्याच्या दुःखापेक्षा, मित्र नापास झाल्याचा जास्त आनंद आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठे काढण्यात आला, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्याची बोलण्याची शैली ऐकून तुम्हालाही हसू येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

नेटकरी काय म्हणतात?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर @harshch20442964 नावाच्या अकाउंटवर पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना ‘मैत्री असावी तर अशी’ असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली, “हो भाऊ, माझ्या मित्रालाही कमी मार्क मिळाल्यावर माझं टेन्शन थोडं कमी झालं होतं.” दुसरा एक म्हणतो, “आपली शिक्षणपद्धती बदलावी लागेल. इतक्या लहान वयात आपण शिक्षणाचा दबाव आणू नये.” आणखी एका यूजरने “सगळ्यांसोबत हे घडतं शाळेत असताना” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे लहान मुलाचं हे बोलण ऐकून अनेकांना हसू अनावर झालं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little boy funny video after he was fail in exam i was in tension due to failure but my friend also failed video viral on social media srk