Train Driver Stops Train: सोशल मीडियाचं जग हे असं आहे की, दररोज एखादा तरी व्हिडीओ किंवा फोटो पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतोच. लोकांची कल्पनाशक्ती जिथे थांबते, तिथून सोशल मीडिया दोन पावलं पुढे जातो आणि असा काहीतरी अनुभव घडवतो, जो पाहून आपण थक्क होतो. तुम्ही जर रोज सोशल मीडियावर थोडा वेळ जरी घालवत असाल, तर तुम्हालाही हे जाणवलं असेल की, दर काही दिवसांनी एक तरी भन्नाट आणि वेगळाच व्हिडीओ डोळ्यांसमोर येतो. अशीच एक भन्नाट घटना सध्या व्हायरल होत असून, तिचा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत.
काय आहे या व्हिडीओत?
हा व्हिडीओ एका रेल्वे फाटकाजवळचा आहे. व्हिडीओत एक माणूस निळ्या रंगाचा शर्ट घालून उभा दिसतो. तो रस्त्यावर उभ्या वाहनांना व्यवस्थित मार्ग दाखवीत असतो. इतक्यात काही लोक त्याला हातवारे करून “फाटक खाली करा”, असा इशारा देतात.
क्षणभर लोकांना असं वाटतं की, हा तर साधा प्रवासी असावा;पण पुढच्याच क्षणी खरी गंमत घडते. हा शर्टधारी गृहस्थ अचानक चालत जाऊन जवळच थांबलेल्या ट्रेनमध्ये चढतो. इथंच लोकांची नजर खिळते. कारण समजतं की, हा कुणी साधा प्रवासी नसून, तोच ट्रेनचा लोको पायलट आहे. त्यानं जी कमाल केली ती व्हिडीओमध्ये कैद झाली आणि आता ती धडाधड व्हायरल होतेय.
पायलटनं का केलं असं?
या व्हिडीओवरून स्पष्ट होतं की, लोको पायलटनं ट्रेन थांबवली आणि स्वतः खाली उतरून रस्त्यावरची वाहनं आधी क्लिअर करून घेतली. कारण- तिथं मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. म्हणजेच ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी आणि रस्त्यावरच्या वाहनचालकांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून त्यानं हे पाऊल उचललं.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?
हा भन्नाट व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून ‘एक्स’ (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर कॅप्शन लिहिलं आहे, “किती चांगला माणूस आहे! स्वतः ट्रेनमधून उतरून ट्रॅफिक क्लीअर करून घेतोय.”आतापर्यंत या व्हिडीओला चार हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. प्रतिक्रियादेखील भन्नाट आहेत. एकानं लिहिलं, “भाई, असं पहिल्यांदाच पाहिलं. काय टाइम आला आहे.” तर दुसरा म्हणतो, “हे फक्त इंडियामध्येच होऊ शकतं!”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो, “वा रे लोको पायलट! तू खरी माणुसकी आदर्श ठेवलीस!”