MahaKumbh 2025: भारतीय संस्कृतीत महाकुंभ मेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा हा सोहळा देशाचा सांस्कृतिक परिचय ठरला आहे. १९५४ साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाचे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले होते. महाकुंभ मेळ्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. प्रत्येक १२ वर्षांनी चार पवित्र ठिकाणी (प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक) हा मेळा भरतो. या मेळ्याला हिंदू धर्मात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. या मेळ्याचे खास आकर्षण म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले जाते. जगभरातील लाखो लोक या संधीचा लाभ घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२५ चा हा महाकुंभ मेळा खूप खास असल्याचे म्हटले जात आहे. कारण दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा १४४ वर्षांनंतर खास संयोग निर्माण करत आहे. खरंतर आतापर्यंत १२ कुंभमेळे पूर्ण झाले आहेत, त्यामुळेच यंदाच्या या कुंभमेळ्याला महाकुंभ असे म्हटले जात आहे. हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर यादरम्यानचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यात अनेक नागा साधू, विविध संत, ऋषी यांचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुंभ मेळ्यात वास्तव्य करत असलेल्या जागेवर एक वृद्ध साधू महाराज खाली बसलेले दिसत असून यावेळी त्यांचे शिष्य त्यांच्या अंगाभोवती भगवे वस्त्र गुंडाळताना दिसत आहेत. यावेळी आसपास उभे असलेले लोक “काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव” असा जयघोष करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर लिहिल्याप्रमाणे या साधू महाराजांनी या कुंभमेळ्यात समाधी घेतली आहे. परंतु ही गोष्ट खरी आहे खोटी हे अद्याप समोर आलेले नाही.

हा व्हिडीओ ट्विटरवरील @mayank679singh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ११ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kumbh mela 25 viral video sadhu maharaj samathi in kumbh mela video is becoming viral sap