Premium

हात बाहेर काढताच खांबाला धडकला; धावत्या ट्रेनमधून खाली पडला अन् थेट रुळाखाली गेला, अंगावर काटा आणणारा Video

Train accident : वायूवेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून पडला तरुण

man fell on track from running train shocking video viral on social media
धावत्या ट्रेनमधून पडला तरुण (Photo: Instagram)

Train accident video viral: ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तुम्हाला अनेकदा ट्रेनच्या दारात काही लोक उभे असलेले दिसले असतील. यापैकी काही लोक आश्चर्यकारक गोष्टी देखील करू लागतात, ज्या अनेकदा त्यांच्याच जीवावर बेततात. यात बहुतेक तरुण पिढीच असते, जी उत्साहात भान हरपते. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओच घ्या, ज्यामध्ये चालत्या ट्रेनच्या दरवाज्यातून हात बाहेर काढताना एका तरुणाचा हात खांबाला आदळतो आणि त्याला हा अतिउत्साह चांगलाच महागात पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हात बाहेर काढताच खांबाला धडकला

सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक ट्रेन वेगाने धावत आहे आणि काही लोक ट्रेनच्या दारात उभे आहेत. इतक्यात त्यातील एकाला गंमत सुचते आणि खेळता खेळता तो हात बाहेर काढून जवळून जाणाऱ्या झाडांला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र, झाडानंतर लगेचच एक खांब येतो, जो त्याच्या हाताला धडकतो आणि ही व्यक्ती ट्रेनच्या बाहेर पडते.

अपघाताचा हा व्हिडिओ ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या अन्य एका प्रवाशाने रेकॉर्ड केला आणि तो ऑनलाइन अपलोड केला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ट्रेनचं चाक अंगावरून गेलं असतं तर त्याचा जागीच मृत्यू झाला असता. पण त्याचं नशीब चांगलं होतं. काही वेळातच तो रुळावरून दूर फेकला गेला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रात्री ऑफिसच्या सीसीटीव्हीत कैद झालं भयानक दृश्य; नाईट शिफ्ट करत असाल तर VIDEO पाहून उडेल थरकाप

व्हिडिओमध्ये अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, याबद्दलही माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. रेल्वे अपघाताचा हा व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man fell on track from running train shocking video viral on social media srk

First published on: 26-09-2023 at 10:57 IST
Next Story
स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची हौस पडली महागात, अचानक पाठीमागून आला वाघ…, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल