Viral Video: चक्क चालत चालत त्याने पार्क केला ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी पडले बुचकळ्यात | Man Parks truck without being in it controlling the steering wheel from outside shocks netizens watch viral video | Loksatta

Viral Video: चक्क चालत चालत त्याने पार्क केला ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी पडले बुचकळ्यात

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत

Viral Video: चक्क चालत चालत त्याने पार्क केला ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी पडले बुचकळ्यात
ट्रकमध्ये न बसता ट्रक पार्क करणाऱ्या या माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ थक्क करणारे असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला बुचकळ्यात टाकणारे असतात. अस खरंच घडू शकतं का असा प्रश्न ते व्हिडीओ पाहून पडतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क चालत ट्रक पार्क करत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक माणूस ट्रकच्या बाजुला उभा असलेला दिसत आहे. सुरूवातीला तो ट्रक पार्क करण्यासाठी दिशा दाखवत असेल असे वाटते. पण त्या ट्रकमध्ये कोणीच बसलेले दिसत नाही आणि मध्येच हा माणूस खाली उभा राहून स्टीअरिंगही पकडतो, त्यामुळे तोच हा ट्रक पार्क करत असल्याचे समजते. या व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली असून, या व्हिडीओला ४७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 16:18 IST
Next Story
अजबच! आई-वडीलांनी मुलाला चक्क रात्रभर टीव्हीसमोर बसवलं अन्…; कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण