Viral Video: पावसाचे आगमन झाले असले तरीही उकाडा काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे उकाडा कमी करण्यासाठी अनेक जण एसी, कूलर आदींची मदत घेताना दिसत आहेत. पण, अनेकदा एसीमधून पाणी गळत. त्यामुळे अनेकजण एसीखाली बादली ठेवतात. यामुळे घरातील फरशीवर पाणी पडत नसलं तरी त्याचा एसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तर आज सोशल मीडियावर या समस्येवर एक जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. एसीमधून गळणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून एक पाईप जोडण्यात आला आहे. नक्की काय जुगाड केला आहे चला सविस्तर जाणून घेऊ.

उन्हाळ्यात तापमान वाढत असताना एअर कंडिशनर आणि कूलर थोडा थंडावा देऊन जातो. पण, एसीतून गळणाऱ्या पाण्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. तर याउलट कूलरमध्ये सतत थंडगार पाणी घालावे लागते. तर यावर उपाय म्हणून एका व्यक्तीने जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. एक इमारत असते. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात एसी लावला आहे. तर तळमजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीने कूलर लावला आहे. तर एसी युनिटला एक पाईप जोडला आहे आणि हा पाईप तळमजल्यावर असणाऱ्या एका कुलरला जोडला आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…पर्यटकांना ‘Hello’ करणाऱ्या वाघिणीला कधी पाहिलं आहे का? मग ताडोबातील राणी मायाचा हा VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा अजब सेटअप पाहून प्रभावित झाला आहे व तो आपल्या मित्राला या सेटअप बद्दल सांगताना व्हिडीओत दिसत आहे. इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी एसीला एक पाईप लावला आहे आणि तोच पाईप तळमजल्यावरील कुलरला जाऊन जोडला आहे. म्हणजेच एसीमधून गळणारे पाणी कुलरमध्ये जाईल आणि थंडगार हवा घरात खेळती राहील. या प्रक्रियेदरम्यान कुठेही पाणी वाया जाणार नाही या उद्देशाने हा जुगाड करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @terakyalenadena या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही व्हिडीओच्या शेवटी ऐकलं असेल की, व्हिडीओत अज्ञात व्यक्तीचा मित्र हा जुगाड पाहून इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीस “हा एलॉन मस्क आहे” असे म्हणताना दिसत आहे. कारण – याने एसीतून गळणाऱ्या पाणी समस्येवर जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. अनेक नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या शब्दात व्यक्तीला ‘हुश्शार’, काही जण ‘जुगाड प्लस समंजसपणा’ (Jugaad+ Samajhdari) तर अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना दिसून आले आहेत.