Viral Video: आनंद असो किंवा तणाव चहाप्रेमींना चहा हा लागतोच. अगदी दिवसाची सुरुवात, तर संध्याकाळी घरी आल्यानंतरही यांना घोटभर चहा लागतो. काही चहाप्रेमी तर स्वतःच्या हातावर किटली आणि चहाचा कप असा टॅटू, तर हातावर मेहेंदीसुद्धा काढून घेतात. तर आज एका चहाप्रेमीने चक्क स्वतःच्या बाईकमध्ये चहाची एक मशीन लावून घेतली आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, त्या व्यक्तीने आपल्या बाईकमध्ये एक मशीन बसवली आहे. ही मशीन तुम्हाला हवा तेव्हा चहा बनवून देईल. तर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे व्यक्तीने त्याच्या बाईकच्या नंबर प्लेटच्या वरच्या बाजूस क्यूआर कोडचा एक बोर्ड लावला आहे. नंतर व्यक्ती मोबाइल काढते आणि बाईकवर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करते. असे केल्यावर बाइकवर लावलेला क्यूआर बोर्ड उघडतो आणि तेथून गरमागरम चहा येतो. एकदा पाहाच तरुणाचा हा अनोखा जुगाड.

हेही वाचा…VIDEO: UPSC मध्ये टॉप केलेल्या आदित्य श्रीवास्तवचं जोरदार सेलिब्रेशन, मित्रांचं प्रेम पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ऑफिसमध्ये चहा किंवा कॉफीसाठी मशीन असते, जी बटण दाबताच चहा किंवा कॉफी सर्व्ह केली जाते. अगदी त्याचप्रमाणे तरुणाने प्रवासादरम्यान चहाचा आनंद घेण्यासाठी एक हटके मशीन, तर चहाचा कप ठेवण्यासाठी दुचाकीच्या मागील बाजूस फोल्ड करण्यायोग्य ट्रे देखील जोडून घेतला आहे. बहुदा त्याने बाईकमध्ये जुगाड करून चहाची मशीन बसवून घेतली आहे, जी अनेकांना विचार करायला भाग पाडत आहे.

वाहनाच्या नंबर प्लेटवर हरियाणाचा नंबर दिसत आहे. तसेच नेटकरी हा जुगाड पाहून विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही जण म्हणत आहेत की, “लांबच्या प्रवासात चहाचे दुकान दिसत नसताना ही बाईक चहाप्रेमींसाठी वरदानापेक्षा कमी नाही”, आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसून आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @theadultshit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी या तरुणाने नंबर प्लेटच्या येथे पाटीवर इंडिकेटर लावून अपघात टाळण्यासाठी उपाय शोधून काढला होता; तर आज त्याने लांबच्या प्रवासात चहा पिण्यासाठी अनोखा जुगाड शोधून काढला आहे.