Accident video viral: इंटरनेटवरील सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथे आश्चर्यकारक अशा भरपूर गोष्टी आहेत. कधी कधी आपण इथे अशा गोष्टी पाहतो की, आपल्याला धक्काच बसतो. काही व्हिडीओ पाहून तर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणंही कठीण होतो. आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला एक व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर समजेल. तुम्ही देव तारी त्याला कोण मारी ही म्हण ऐकली असेलच. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या म्हणीचा प्रत्यय नक्की येईल. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की, एखादी व्यक्ती मृत्यूपासून इंचभरच दूर होती; पण त्याचे नशीबही तितकेच बलवान होते. मृत्यूला स्पर्श करून ती व्यक्ती परत आली. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होती; पण म्हणतात ना काळ आला होता, वेळ नाही. याच बाबीचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. या व्यक्तीशी संबंधित हा धक्कादायक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहे. त्यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करीत आहेत. नेमकं घडलं तरी काय ते जाणून घेऊया…

मरणाच्या जवळ आली व्यक्ती पण…

सुरुवातीपासूनच व्हिडीओ पाहिल्यास पावसाळ्याचा काळ असल्याचे दिसून येते. काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये असे दिसते की, एक व्यक्ती भिजण्यापासून वाचण्यासाठी छत्री घेऊन रस्त्याने जात आहे. हे भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद होत असताना ही व्यक्ती रस्त्यावरून आरामात जात होती. काही अंतरावर गेल्यावर त्या व्यक्तीजवळ असलेली लांब भिंत पावसाच्या अखंड व जोरदार माऱ्यामुळे कोसळू लागली. भिंत हळूहळू खाली पडत असताना त्या व्यक्तीला त्याची कल्पनाही नव्हती.

(हे ही वाचा : दोस्त, दोस्त ना रहा…! भुकेल्या मगरीने केली साथीदार मगरीचीच शिकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त)

येथे पाहा व्हिडीओ

त्या व्यक्तीवर अचानक एक मोठी भिंत पडल्याचे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, त्या व्यक्तीचे नशीब इतके बलवान होते की, त्या व्यक्तीपासून ती भिंत अगदी इंचभरच दूर होती. नुसते बघून असे वाटते की, भिंत त्या व्यक्तीच्या अंगावर पडली असती, तर तिला जीव गमवावा लागला असता. फ्रेमच्या शेवटी आपण पाहू की, भिंत पडल्यानंतर, व्यक्ती ताबडतोब स्वत:ला सुरक्षित अंतरावर हलवते. फ्रेममधले हे असे दृश्य आहे की, कुणीही ते पाहिलं, तर त्याला चमत्कारच म्हणतील. अमृत969666 नावाच्या हॅण्डलवरून हा आश्चर्यकारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आल्याची माहिती आहे.