Video : ‘बेशरम रंग’ गाण्यावर मराठी अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये थिरकली, बोल्ड अदांनी नेटकऱ्यांना केलं घायाळ

बेशरम रंग गाण्यावरील बोल्ड डान्सचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ते हावभाव….

Marathi Actress Bold Dance Viral Video on Instagram
मराठी अभिनेत्रीचा बोल्ड डान्स व्हायरल झाला. (Image-Instagram)

Besharam Rang Song Recreation Video : शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर पठाण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण येत्या बुधावारी २५ जानेवारीला चित्रपटगृहात पठाण सिनेमाचा गजर वाजणार आहे. पठाण सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. भगव्या रंगाच्या कपड्यांवरून पठाण सिनेमावर जोरदार टीका करण्यात आली होती. बेशरम रंग गाण्याने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला होता. मागील काही दिवसांपासून या गाण्याचे रिक्रिएशने व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडीओनं पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी अभिनेत्री प्रियंका जाधवने बेशरम रंग गाण्यावर स्विमिंग पूलमध्ये बोल्ड डान्स केलाय. बेशरम रंग गाण्यावरचा तिचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

बेशरम रंग गाण्यावरील बोल्ड डान्सचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ते हावभाव….

प्रियंकाने स्विमसुट घालून बेशरम रंग गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावल्याचं व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. बेशरम रंग गाण्यावर प्रियंकाने रिक्रिएशन करून जबरदस्त डान्स सादर केला आहे. तिच्या मोहक अदांनी हजारो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओला जवळपास ७ हजार लोकांनी लाईक केलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “खरंच तुम्ही अनेक मुलींना प्रेरणा दिली. स्वत:वर प्रेम करा असा मेसेजच तुम्ही या व्हिडीओद्वारे दिलाय. तूम्ही या व्हिडीओत खूप सुंदर दिसत आहेत.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “ते हावभाव खूपच सुंदर आहेत.” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “सिझलिंग अॅण्ड हॉट.”

नक्की वाचा – लग्नमंडपात झोपून ‘अंग लगा दे’ गाण्यावर थिरकली, पाकिस्तानच्या या तरुणीची चर्चा का होतेय? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

शाहरुख खान मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांमघ्ये सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर पठाण सिनेमाचा बोलबाला गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच ‘पठाण’चे शो हाऊसफुल झाले असल्याची माहिती समोर आलीय. २००० ते २४०० रुपयांपर्यंत पठाण सिनेमाच्या तिकिटाची विक्री होत असल्याचंही समजते. मन्नतच्या बाहेर शेकडो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्याचा व्हिडीओही शाहरुख खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आता बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमा किती कोटींचा गल्ला जमावतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 15:04 IST
Next Story
धीरेंद्र कृष्ण महाराजांची ‘चमत्कारिक चिठ्ठी’ आहे तरी काय? माईंड रीडरचा थक्क करणारा Video होतोय Viral
Exit mobile version