Viral video: मोबाईल हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे . अगदी लहानग्यांपासून वरीष्ठापर्यंत हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. या मोबाईलचा अतिरेक झाला की त्याचे काय परिणाम होतात हे सगळ्यांना ठाऊकच आहे. आपल्याला अनेकदा सांगितलं जातं. मोबाईल चार्जिंगला लावल्यावर वापरु नका, चार्जिंगला असताना फोनवर बालू नका. मात्र तरीही काही लोक मोबाईल चार्जिंगला असताना वापरतात. यामुळे मोबाईलचा स्फोट झाल्याची अनेक प्रकरणं तुम्ही याआधीही पाहिली असतील. दरम्यान अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. यामध्ये एक तरुण मोबाईल चार्जिंगला लावून फोनवर बोलत होता, यावेळी त्याच्यासोबतच जे घडलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ पाहून तुम्ही यापुढे कधीच मोबाईल चार्जिंगला असताना वापरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण खूर्चीवर बसून फोनवर बोलत आहे . मात्र याचवेळी त्यानं फोन चार्जिगंलाही लावला आहे. हा तरुण फोन चार्जिगंला लावून बोलत आहे. यावेळी त्याच्या कानाजवळ मोठा आवाज होतो आणि तरुण खूर्जीवरुन धाडकन उठतो. तसेच तो हातातला मोबाईलही फेकून देतो. यावेळ तो सतत कानाला हात लावताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर त्याचं झालं असं की या तरुणाचा फोनवर बोलता बोलता कान फुटला आहे. फोनवर बोलताना व्यक्तीने केलेली एक चूक त्याला महागात पडली.

चार्जिंगला लावून फोनवर बोलताना फोनचा स्फोट होतो आणि त्याच्या कानाला मोठी इजा होते. त्यामुळे कधीच मोबाईल चार्जिगंला असताना वापरचा नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> क्षणार्धात होत्याचं नव्हतं! समुद्रकिनारी मौजमजा सुरु, तेवढ्यात मोठी लाट आली अन्…अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @@ChapraZila या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile phone blast while talk on smartphone charging shocking video viral