आई टीव्ही स्क्रीनवर खेळत होती गेम; अचानक मुलांनी केले असे काही…; पाहा Viral Video

काही मुले त्यांच्या आईला टीव्हीवर गेम खेळण्यासाठी स्क्रीनजवळ पाठवतात, पण यादरम्यान असे काही घडते की तुम्हाला हसू येईल.

viral video
हा व्हिडीओ rohiiits नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

मुलं आपल्या आईशी मस्करी करत राहतात. एवढेच नाही तर ते आईला मूर्ख बनवून फिरायलाही जातात. आजच्या युगात बहुतांश पालकांना तांत्रिक ज्ञान नाही, त्याचा फायदा घेत मुले त्यांची चेष्टा करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही मुले त्यांच्या आईला टीव्हीवर गेम खेळण्यासाठी स्क्रीनजवळ पाठवतात, पण यादरम्यान असे काही घडते की तुम्हाला हसू येईल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या आईला टीव्ही स्क्रीनजवळ पाठवतो आणि त्यांना गेम खेळायला सांगतो. तो त्याच्या आईला म्हणतो की टिव्हीवर बोटाने बॉल वरच्या बाजूने ढकलला तर तो वर जाईल, पण आईला काय माहीत की मुलं मस्करी करत आहेत. काही सेकंदात टीव्ही स्क्रीनवर एक भयानक चित्र दिसते आणि मोठा आवाज येतो. हे ऐकून आई घाबरते आणि दचकून मागे होते. समोर बसलेली मुलं जोरजोरात हसायला लागतात, पण आई मात्र फारच घाबरलेली असते.

अर्ध्या रात्री बूक केली Uber Cab; किती वेळात पोहोचणार विचारताच ड्रायव्हरचं भन्नाट उत्तर, म्हणाला “पराठा…”

आईसोबतचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, मात्र काही लोक या प्रॅन्कवरून मुलांना खडसावत आहेत. हा व्हिडीओ rohiiits नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ९१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘भाऊ, असे करू नका, एखाद्या दिवशी समस्या येऊ शकते.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘मम्मी सुद्धा विचार करत असतील की जर तू माझा मुलगा नसता तर तुला रद्दीवाल्याला दिले असते.’ अशाच प्रकारे अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mom was playing games on the tv screen suddenly something that the kids did watch viral video pvp

Next Story
शाळेच्या गेटवरच मुली आपआपसात भिडल्या, पार एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO VIRAL
फोटो गॅलरी