सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांच्या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे अनेकजण प्राण्यांच्या विविध हालचाली कॅमेऱ्यात कैद करतात आणि ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. या व्हिडीओंमध्ये प्राण्यांमधील वेगवेगळे गुण आपणाला पाहायला मिळतात. तर कधी त्यांच्या भयंकर कृत्यांचे तर कधी अंगावर शहारा आणणाऱ्या घटनांचेही व्हिडीओदेखील पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही दिवसांपुर्वी माकडांनी कुत्र्यांना उचलून झाडांवरुन आणि छतावरून खाली फेकल्याच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते, जे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. शिवाय माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील अनेकांनी केली होती. अशातच आता आणखी एका माकडाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माकडाने कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीच्या छतावर नेल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली, शाळकरी मुलांना ट्रॅक्टरमधून बाहेर काढतानाचा Video व्हायरल

हेही पाहा- लग्न ठरलंय? सावधान! आधी कोर्ट मॅरेज नंतर घरच्यांच्या इच्छेने ७ फेरे; सासरी पोहोचायच्या आधीच पळाली नवरी, कारण…

ही घटना राजस्थानमधील जयपूर येथील गणगौरी बाजारची असल्याचं सांगितलं जातआहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुकानाच्या छतावर बसलेल्या एका माकडाच्या हातात कुत्र्याचं छोटं पिल्लू दिसत आहे. दुकानासमोर उभ्या असणाऱ्या माणसांचा आवाज ऐकताच हे माकड तिथून उठते आणि पिल्लाला हातात धरून इमारतीवर उड्या मारुन पळून जाते. त्याने या पिल्लाला पळवून नेल्यामुळे कुत्र्याचं पिल्लू घाबरलेलंही दिसत आहे

@HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये ‘जयपूरच्या गणगौरी मार्केटमध्ये माकडाने कुत्र्याचे पिल्लू पळवल्यां लिहिलं आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कुत्र्यांचे आणि माकडाचे टोळीयुद्ध सुरूच असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी, कृपया त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवा असंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkey kidnapped a street dog in jaipur video goes viral on social media jap