Sasu sun dance video: सोशल मीडियावर नवरदेव आणि नवरीचे अनेक असे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात दोघंही लग्नासाठी अतिशय उत्सुक असतात. आपलं लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी वधू आणि वर दोन्हीकडून प्रयत्न सुरू असतात.लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यामध्ये नवरा नवरी नाही तर चक्क सासूबाईंच्या डान्सची चर्चा रंगली आहे. आपल्या होणाऱ्या सुनेच्या स्वागतासाठी सासूबाईंनी तुफान डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हीही पाहा हा व्हिडीओ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सासू-सून यांच्यातील नातेसंबंधांवर अनेक टीव्ही शोज आहेत, ज्यामध्ये त्यांच्यातील तू-तू-मैं-मैं बघायला मिळते. अनेक सासू आणि सूनेच्या नादात मज्जा कमी आणि वाद जास्त असतात. हे अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. अनेक सुना सांगतात की सासू आपल्याला आपल्या मुलीसारखी का वागवत नाही. तर सून आपल्याशी आईसारखी वागणूक का देत नाही, अशी सासूची तक्रार असते. लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सासूने “मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅग जिचा भारी..बायको पाहिजे नखरेवाली” ..” या गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी सासूबाईंचा उत्साह पाहून तुम्हीही कौतुक कराल. यावेळी त्या वेगवेगळ्या स्टेप्सही मारत आहेत. त्यांच्या बाजूला आणखी एक महिला आहे त्या सुद्धा डान्स करताना दिसत आहेत. तर सासूबाईंना पाहून सुनेलाही मोह आवरता आला नाही, सूनही नाचताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> विमानाला उशीर झाला अन् संतप्त प्रवासी एअर होस्टेसवर चिडला; मुंबई विमानतळावरील ‘हा’ VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?

सोशल मीडियावर @rajat_dhawaskar_photography या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओ पोस्ट करत त्यावर “जेव्हा सासुला आपली आवडती सून भेटते तेव्हा” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law dance for daughter in law welcome wedding ceremony nakhrewali song video viral srk