Shocking video: आजकाल सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओचा भडीमार पाहायला मिळतो.आणि त्यात या रिल्ससाठी कोण काय करेल हे सांगता यायचं नाही. रिल्सला व्ह्युज, लाइक्ससाठी कोणत्याही थराला जातील काही सांगता यायच नाही. पण याच व्हिडीओसाठी एका आईला आपल्या बाळाचाही काही फरत पडत नसेल तर.आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका आईनं रिलच्या नादात आपल्या लहान बाळाला मृत्यूच्या दारात पोहोचवलं..याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिल्ससाठी, व्ह्युजसाठी एका आईने जे कृत्य केलं ते पाहून कोणालाही संताप येईल, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या महिलेला प्रचंड ट्रोल केलं आहे. आताच्या पिढीतील काही लोक जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. असाच लाजिरवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका आईनं आपल्या बाळाला चक्क इमारतीच्या गच्चीवरील कडांवर बसवलं आहे. एवढ्या उंचावर बाळाला तिनं अक्षरश: पाय खाली सोडून बसवलं आहे. यामध्ये बाळ जरा तरी हललं तरी थेट खाली पडू शकतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन व्हिडीओ बनवताना दिसतेय.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @varsha._.yaduvanshi नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी महिलेवर टीका केली आहे. मुलाच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री करण्याऐवजी काही सेकंदांच्या लहान रीलला जास्त महत्त्व देणाऱ्या महिलेवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. “आजकालच्या आया अशा कशा”, “रिल पुन्हा बनवता येईल पण लेकरु गेलं तर पुन्हा येईल का ”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral srk