Viral video: आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करते. तसे प्रेम कोणीही करू शकत नाही. आई शेवटी आई असते. आपल्या मुलांना संकटातून वाचवण्यासाठी ती देवाचे रूप घेते. एक अशी मन आहे की, देव सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून देवाने आईची निर्मिती केली आहे. आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते, याचे प्रत्यय दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील आईचे सर्वत्र काैतुक होताना दिसत आहे. असं म्हणतात की आईकडून मूल कोणी हिरावून घेऊ शकत नाही. समोर जरी यमराज उभा असला तरी.

आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. अशाच एका आईने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या दोन मुलींना अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आणलंय. सापानं विळखा घातलेल्या आपल्या मुलींना तिनं कसं बाहेर काढल पाहाच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुली आपल्या आईबरोबर घराबाहेर पडताच एक साप तिथे होता. यावेळी या सापानं क्षणातच दोन्ही मुलींभोवती विळखा घातला. घाबरलेल्या मुली रडायला लागल्या आणि एकडे तिकडे पळू लागल्या तसा सापही हल्ला करण्यासाठी त्यांच्या मागे लागला. यावेळी आईने पुढे जात आधी एकीला मग दुसरीला असं करत सापाच्या विळख्यातून बाहेर काढलं.

पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @@ChapraZila या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले – सर शेवटी आईचं काळीज आहे ते. प्रेमाचा, करुणेचा संदेश देणारा हा व्हिडीओ लोकांना खूपच भावलाय.