Jugad video viral : भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.

याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे. एका तरुणानं चक्क जुगाड वापरून टच खराब झालेल्या मोबाईलचा टच कसा सुरु केला ते एकदा बघाच. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाानं आपला मोबाईल खराब झाल्यावर माऊसच्या मदतीने ऑपरेट करण्यास सुरुवात केली.

मोबाईलला लावला माउस

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलाने मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यावर माऊस लावून मोबाईल चालवायला सुरुवात केली. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की फोन पडल्यानंतर अनेकदा स्क्रीन तुटते, जी एकतर दुरुस्त करावी लागते किंवा पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी नवीन फोन घालावा लागतो. डिस्प्ले तुटल्यानंतर नवीन डिस्प्ले लावावा लागतो जो खूप खर्चीक असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फोनच्या स्क्रीनवर टच न करताही मोबाईल वापरता येतो? हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. होय, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाच्या हातात तुटलेला फोन आहे, जेव्हा त्याला विचारले जाते की तो हा खराब डिस्प्ले असलेला फोन कसा वापरतो, तेव्हा तो त्याच्या खिशातून माउस काढतो आणि त्याला जोडतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो माऊस फोनवरही काम करतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हेल्मेट न घालता गाडी चालवता? बघा पोलीस एकाचवेळी अनेकांचे ऑनलाईन चलान कसे कापतात; VIDEO पाहून बसेल धक्का

यूजर्सच्या प्रतिक्रिया

Daily_over_dose नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत १ लाख २४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला ४ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर वापरकर्तेही कमेंट करत आहेत, एका वापरकर्त्याने लिहिले…भारत नवशिक्यांसाठी नाही, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…या माऊसने टाइप करण्याचा प्रयत्न करा आणि मग मी मानेन.तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… काय मूर्खपणा, फक्त कर्सर हलवून फोन कसा चालतो.