Mumbai local viral video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये एका तरुणीनं लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही गाण्यावर थिरकायला लागाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच तरुणीची थेट लोकल ट्रेनमधली जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी लोकलच्या डब्यात नऊवारी साडी नेसून “मै कोल्हापूरसे आई हूं” या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करत आहे. घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या तरुणींनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे, या तरुणींचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या तरुणींनीही असंच सादरीकरण केलं आहे. शेवटी ती एका हॉटेलंच प्रमोशनही करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ archu_gavali84 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर नेटकरीही भरभरून कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने म्हंटलं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशीच जपा. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली “जबरदस्त लावणीचा ठसका”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local video of girl dancing on a marathi song main kolhapur se aayi hoon going viral on social media srk