Mumbai Local Couple Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना वेगवेगळ्या प्रकारची लोकं पाहायला मिळतात. यात बहुतांश वेळा अनेकजण आपल्या सगळ्या सीमा ओलांडतात. कधी रागाच्या तर कधी प्रेमाच्या कधी कधी तर केवळ धीटपणाच्या मर्यादा सोडून वागताना लोक पाहायला मिळतात. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील दोन जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी दंग झाले आहेत की आपल्या आजूबाजूला कोण आहे, आपण कुठे आहोत याचा त्यांना पूर्ण विसर पडला आहे. तुफान गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये रोमान्स करणाऱ्या या कपलचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये भलताच वाद रंगला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक कपल एकमेकांच्या मिठीत गुंग झालं आहे. तर दुसरं एक कपल किस करत आहे. विंडो सिटवर बसलेल्या मुलाच्या मांडीवर मुलगी बसलेली दिसत आहे. मुलाच्या मांडीवर बसून ही मुलगी मोबाईल पाहत आहे. या व्हिडिओमधली दोन्ही कपल कॉलेजला जाणारे विद्यार्थी दिसत आहेत.

Video: मुंबई लोकलमध्ये जोडपं झालं बेभान

@ViralBaba नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सांताक्रुझ ते लोअर परळ या स्टेशनदरम्यानचा असल्याचंही ट्वीट करणाऱ्या यूजरने सांगितलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे, तसंच सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली जात आहे. लाज सोडली तरी भीती पण वाटत नाही का? असाही प्रश्न नेटकरी करत आहेत.

हे ही वाचा<< मुंबईत धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर फेकला पेटता रुमाल; अपंग डब्यातील धक्कादायक प्रकार

तर दुसरीकडे नेटकऱ्यांच्या एका गटाने हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरवर ताशेरे ओढले आहेत. तुम्हाला लोकलमध्ये भांडणे आवडतात लोकांना प्रेमाने जगायचं असेल तर काय हरकत आहे असेही नेटकऱ्यांनी विचारले आहे .

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local viral video two couple cross limit kiss and hugs in vulgar manner netizens call them shameless svs
Show comments