Navratri kids garba steps viral: नवरात्रीचा उत्सव लहान-मोठ्या सगळ्यांसाठीच खूप खास आणि उत्साहाचा असतो. देवीची स्थापना, पूजा तसंच गरबा अशा बऱ्याच गोष्टींमुळे अगदी प्रसन्न वातावरण असते. यामध्येच नवरात्रीच प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे गरबा. गरबा खेळणं हे धार्मिक, हौसं किंवा आवड अशा बऱ्याच कारणांसाठी असतं. मोठे लोकं तर बेधुंद होऊन गरबा खेळताना दिसतातच, पण लहान मुलंही काही मागे नाहीत. देशभरात अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. मोठ्यांसोबत लहानही या सणाचा तितकाच आनंद लुटताना दिसतात. वेगवेगळ्या गाण्यांवर आणि वेगवेगळ्या स्टाइलमध्ये गरबा खेळताना लहान मुलांचा स्वॅग काही वेगळाच दिसतो. अशा मुलांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले नसतील ते आवर्जून पहा…

काव्य नावाच्या एका मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. डिंपल गोहील या इंस्टाग्राम अकाउंटवरून या व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा मुलगा भले नाचायला शिकत असेल, पण अशाप्रकारे सराईतपणे गरबा खेळणं तर अनेक तरूणांनाही जमत नाही. The Goggle step असं या पोस्टला कॅप्शन आहे.

दुसऱ्या एका लहानशा चिमुकल्याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे. गरब्याच्या ड्रेसमधला हा चिमुकला गलगोटो या गुजराती ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

या मुलांचे व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ही मुलं खऱ्या अर्थाने त्यांचं बालपण एन्जॉय करत आहेत अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.