Navratri Fasting Rules: नवरात्रीचा उपवास हा आत्मसंयम, भक्ती आणि आत्मा शुद्धीकरणाचा प्रवास आहे असं म्हटलं जातं. हा उपवास देवी दुर्गेशी असलेलं नातं मजबूत करतो. शरीराला ऋतूंशी जुळवून घेण्यास मदत करतो. हा उपवास करण्याचे काही नियम आहेत असं मानलं जातं…शारदीय नवरात्र, महानवरात्र म्हणूनही ओळखली जाते. ही भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. ती अश्विन महिन्यात म्हणजेच शरद ऋतूमध्ये येते म्हणूनच त्याला शारदीय नवरात्र असे म्हणतात. या ९ दिवसांमध्ये स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
नवरात्र उपवासाची परंपरा
नवरात्रीचा उपवास हा देवी दुर्गेच्या भक्तीचा सर्वात महत्त्वाचा प्रकार मानला जातो. काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात, तर काही लोक पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.
नवरात्रीच्या उपवासाचे आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे
नवरात्रीचे व्रत केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि सुख, समृद्धी, यश असे आशीर्वाद देते असं मानलं जातं. हे उपवा केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच फायदेशीर नाहीत, तर शारीरिकदृष्ट्यादेखील फायदेशीर आहेत. ऋतू बदलाच्या वेळी उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ऊर्जा संतुलित होते आणि बदलत्या ऋतूंशी जुळवून घेण्यासाठी शरीर तयार होते. इच्छा आणि सुखांचा त्याग करणे हेदेखील देवी दुर्गेच्या भक्तीचे प्रतीक मानले जाते.
उपवास करताना कोणती काळजी घ्यावी?
नवरात्रीचा उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नाही, तर त्यात जीवनशैली आणि आचार-विचारांचे नियमदेखील समाविष्ट आहेत.
लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी कडक उपवास करू नये.
मांस, अंडी, कांदे, लसूण आणि साधे मीठ टाळा. फक्त सैंधव मीठ वापरा.
दारू, सिगारेट आणि ड्रग्जपासून दूर रहा.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी, दूध आणि ताज्या फळांचे रस प्या.
सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि दुर्गेची पूजा करा.
काळे कपडे घालणे टाळा, कारण ते अशुभ मानले जाते.
नवरात्रीत केस कापणे, नखे कापणे किंवा मुंडण करणे योग्य मानले जात नाही.
पुरूष आणि महिला दोघेही उपवास करू शकतात. जर नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल तर काही दिवस उपवास करता येतो.
पारंपरिकपणे, संध्याकाळी सात्विक जेवण करावे. दिवसा फळे, दूध आणि रस सेवन केले जाऊ शकते.
या काळात दानधर्म करणे हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्या पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये लहान मुलींची दुर्गेच्या रूपात पूजा केली जाते.
नवरात्रीच्या उपवासादरम्यान काय खावे?
पीठ- बकव्हीट (कुट्टू), राजगिरा आणि शिंगाडा याचे पीठ पुऱ्या किंवा इतर पदार्थांसाठी वापरले जाते.
साबुदाणा- खिचडी, वडा आणि खीर
फळे व दुग्धजन्य पदार्थ- ताजी फळे, दूध, दही आणि घरगुती रस हे मुख्य अन्न आहे
भाज्या- भोपळा, बटाटा, पालक, टोमॅटो आणि सिमला मिरची यासारख्या भाज्या खाल्ल्या जातात.
सैंधव मीठ- साध्या मीठाऐवजी सैंधव मीठ वापरावे.
सामक तांदूळ- सामक तांदूळ म्हणजे वरई.
नवरात्रीत कोणते पदार्थ खाऊ नये?
गहू, तांदूळ आणि त्यापासून बनवलेले पदार्थ
डाळी
कांदा आणि लसूण
मांस, मासे आणि अंडी
दारू, सिगारेट आणि ड्रग्ज
पॅकेज्ड फूड किंवा ज्यूस.