Premium

दिसतं तसं नसतं…! ऑप्टिकल इल्यूजन पाहून नेटकरी झाले थक्क, व्हायरल VIDEO पाहिल्यानंतर चक्रावून जाईल तुमचंही डोकं

व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनच्या व्हिडीओत तुम्हाला जे दृश्य दिसत आहेत ते खरे नसून खोटे आहे यावर अनेकांता विश्वास बसत नाहीये.

amazing optical illusion
ऑप्टिकल इल्यूजन पाहून नेटकरी झाले थक्क. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर असे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये दिसते एक आणि प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये दुसरेच काहीतरी असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला व्हायरल होत आहे. या १७ सेकंदाच्या व्हिडीओने अनेक लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. कारण व्हिडीओत तुम्हाला जे दृश्य दिसत आहेत ते खरे नसून खोटे आहे यावर अनेकांता विश्वास बसत नाहीये. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीदेखील क्षणभर विचारात पडाल यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये एक वस्तू फिरताना दिसत आहे. तिच्याकडे पाहून कोणाचाही विश्वास बसेल की ती पूर्णपणे गोलाकार आहे आणि तिच्यावर अनेक थर आहेत. मात्र वस्तूवरुन कॅमेरा दुसऱ्या बाजूला जाताच आपल्या लक्षात येते की आपण जे पाहत होतो तसं काहीच नसून हा व्हिडीओ ऑप्टिकल इल्यूजन प्रकार आहे.

हेही वाचा- व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळला पतीचा अ‍ॅपल एअरपॉड, मैत्रीणीशी बोलण्याच्या नादात केला विचित्र पराक्रम

आपण ऑप्टिकल इल्यूजनचे एकाहून एक फोटो सोशल मीडियावर पाहत असतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक गोंधळून जातात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. कारण ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजर असते. अशी माणसं अशाप्रकारच्या टेस्टमध्ये पास होतात. त्यामुळे या व्हिडीओमध्येही जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर या व्हिडीओचे खरे गूढ तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतं.

१२ सप्टेंबर रोजी @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “जबरदस्त ऑप्टिकल इल्यूजन” या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी याऑप्टिकल इल्युजनला आश्चर्यकारक म्हटलं आहे तर काहींनी हा डोकं फिरवणारा इल्युजन असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने लिहिलं, “हे पाहून माझं डोकं फिरलं.” काहींनी प्रकरण काय आहे हे शेवटपर्यंत कळलं नसल्याचं म्हटलं आहे. तरएका व्यक्तीने गे सर्वोत्तम ऑप्टिकल इल्युजन असल्याचं म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netizens were stunned to see the amazing optical illusion after watching the viral video your head will be dizzy too jap

First published on: 14-09-2023 at 17:20 IST
Next Story
देशी जुगाड करून बनवली पायंडल नसलेली अनोखी सायकल, भन्नाट Video पाहून लोक चक्रावले