कला ही देवाने दिलेली देणगी आहे. प्रत्येकाकडे कोणती ना कोणती कला असते फक्त ती ओळखून जोपसता आली पाहिजे. कला जोपासण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. तुम्ही तरुण असो किंवा वयोवृद्ध तुम्ही तुमची कला जोपसली पाहिजे. नृत्य ही अशीच एक कला आहे जी जोपासण्यासाठी वयाचे कसलेही बंधन नसते. याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सत्तरी ओलांडलेल्या आजींनी लावणी नृत्य करताना दिसत आहे. आजींचे नृत्य सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजीबाईंनी ट्रॅक्टरवर चढून केला होता डान्स (Ganesh Visarjan Pune: Elderly Woman’s Tractor Dance)

विशेष म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान याच आजींनी ट्रॅक्टरवर चढून डान्स केला होता. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता आजींचा आणखी एक व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.

आजींबाईंचा नवा व्हिडीओ चर्चेत

नवीन व्हायरल व्हिडीओमध्ये या आजींनी “बुगडी माझी सांडली” या गाण्यावर लावणी नृत्य करताना दिसत आहे. गाण्याच्या बोल ऐकून आजींची एकापेक्षा एक अचूक हावभाव देत आहेत, गिरक्या घेत आहेत. आपल्या पद्धतीने मस्त नृत्य करत आनंद घेत आहे. विशेष म्हणजे आजींनी पांरपारिक पद्धतीने साडी नेसली आहे, कपाळी लाल कुंकू लावले आहे. नाचताना आजींनी डोक्यावर पदर घेतला आहे. आपल्याच शैलीमध्ये नृत्य करणाऱ्या आजींनी नेटकऱ्यांची मन जिंकले आहे.

व्हायरल व्हिडिओ गणेशोत्सवादरम्यानच आहे. आजींची मागे एक गणेशमंडळाची मूर्ती दिसत आहे ज्यावर लिहिले आहे की, श्री गणेश पार्क मित्र मंडळ, ससाणे नगर, हडपसर “

हेही वाचा – पुणे तिथे काय उणे! ट्रॅक्टरवर चढून नाचल्या ७२ वर्षांच्या पुणेरी आजीबाई, Video तुफान Viral

येथे पाहा आजींबाईंची लावणी

हेही वाचा – “याला म्हणतात संस्कार!” चार वर्षाच्या चिमुकल्याने केली शिवगर्जना! व्हिडीओ पाहून येईल अंगावर शहारा

आजींनी नेटकऱ्यांचे जिंकले मन

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करून नेटकऱ्यांनी आजींचे तोंडभरून कौतूक केले आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, या वर्षी टिळक रोडवरील गणपती विसर्जन मिरवणूक या आजींनी गाजवली. आपली आवड जपतना वयाची अट नसते हे आजीनी दाखवून दिलं.”

दुसऱ्याने लिहिले की, “आजी मला तुमच्यात सुलोचना दिदी दिसली. अगदी तसाच हावभाव आणि तो डोक्यावर पदर”

तिसर्‍याने कमेंट केली की, “संस्कृतीने नटलेली पिढी आहे ही.

चौथ्याने लिहिले की, “खूप सुंदर आईआजी जुनं ते सोनं म्हणतात हेच खरे. आनंदी जीवन कसं जगावं हे आईआजीला पाहून शिका”

पाचव्याने लिहिले की, “मनं कधीचं म्हातारं होत नाही”

हेही वाचा –मीठ अन् साखर नव्हे हा आहे पाण्यात विरघळणारा पदार्थ, रिक्षावरील पोस्टरमुळे रंगली चर्चा, पाहा Viral Post

“बुगडी माझी सांडली गं” गाण्याबद्दल जाणून घ्या

बुगडी माझी सांडली ग हे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी गायलेले लोकप्रिय मराठी लावणी गाणे आहे. हे गाणे “सांगते ऐका” चित्रपटातील असून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयश्री गडकर यांनी नृत्य सादर केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New video of grandmother dancing on a tractor in ganesh visarjan procession in pune 72 year old grandmother perform lavani dance bugadi majhi sandli ga song snk