Nikhil Kamath Podcast Spoof viral video : निखील कामत यांचे डब्लूटीएफ पॉडकास्ट नियमित ऐकणाऱ्यांची सख्या मोठी आहे. या पॉडकास्टमध्ये निखिल कामथ हे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना दिसतात. मात्र आता त्यांच्या पॉडकास्टच्या खास शैलीचे अत्यंत मजेशीर उपहासात्मक विडंबन (spoof) व्हायरल झाले आहे. एका कंटेन्ट क्रिएटरन कामथ यांची आणि पॉडकास्टमध्ये ते विचारतात त्या प्रश्नांची हुबेहुब नक्कल केली आहे.
कंटेन्ट क्रिएटर रोहित राघवेंद्र याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो झेरोधाचे सह-संस्थापक निखील कामत यांची नक्कल करताना दिसत आहे. निखिल कामथ यांची त्यांच्या पॉडकास्टमध्ये बोलण्याची एक वेगळी शैली आहे, रोहितने ती एकदम अचूक पकडली आहे. ही नक्कल करताना रोहित काही अत्यंत विचित्र प्रश्न पण एकदम गंभीर आवाजात विचारताना दिसत आहे. जे थेट निखील कामत यांच्या पॉडकास्टमधून घेतल्यासारखे वाटावेत असे आहेत.
“मला फॅन्सी जेवण देत असताना तुम्ही मला असे गंभीर प्रश्न विचारू शकत नाहीत, मी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकतो, ” कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये सतत दिसणार्या फॅन्सी खाद्यपदार्थांचा संदर्भ देत राखवेंद्र याने व्हिडीओला असे कॅप्शन दिले आहे. पण व्हिडीओमध्ये त्याच्या समोर प्लेटमध्ये एक केळी आणि चमचे ठेवल्याचे दिसत आहे.
या मजेशीर व्हिडीओमध्ये राखवेंद्र अनेक विनोदी प्रश्न कामथ यांची नक्कल करत खास त्यांच्या शैलीत विचारताना दिसत आहे. जसे की, “रक्षाबंधनाच्या रीलमध्ये आपल्या भावाला चापट मारून व्हायरल झाला, पण आता मेडिटेशन पॉडकास्ट सुरू करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसाठी तुमचा काय सल्ला असेल?” आणि “दिल्लीतील रिक्षावाला साईड-हसल म्हणून क्रिएटर इकॉनॉमी तयार करण्यासाठी कोणते मेंटल मॉडल वापरू शकतो?”
निखिल कामथ याची प्रतिक्रिया
या व्हिडीओने लगेचच कामथचे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर हसण्याच्या इमोजी वापरून हा व्हिडीओ पोस्ट केला.
शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनीही एका शब्दात या व्हिजीओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या व्हिडीओला मजेदार म्हटले आहे.
दरम्यान रोहित राघवेंद्र याच्या या व्हिडीओला भरभरून प्रेम मिळत आहे. कमेंटमध्ये नेटकरी त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. दरम्यान निखिल कामथ यांचे डब्लूटीएफ या पोडाकस्टचे युट्युबवर जवळपास १.५८ दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. ज्यामध्ये बिल गेट्सपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे.