लेल्या आणि आता बंगळुरूच्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या माणसाची कहाणी खरोखरच धक्कादायक आहे. सोशल मीडियावर एका लोकप्रिय कन्टेंट निर्मात्याने सांगितले ही कथा अनेकांना थक्क करून सोडते कारण ती जीवनाला अनपेक्षित आणि कधीकधी दु:खद वळणांवर प्रकाश टाकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेक प्रोफेशनल, उद्योजक आणि जागतिक व्यवसायांसाठी केंद्र असलेल्या बंगळुरूच्या रस्त्यावर एकेकाळी इंजिनिअर असलेला व्यक्ती आज भीक मागत असल्याचे समोर आले आहे. कन्टेंट निर्मात्याने @sharath_yuvaraja_official याने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्तीने जीर्ण झालेला गुलाबी टी-शर्ट आणि जीन्स घातलेला आहे. तो भीक मागून जगण्यासाठी धडपडत असलेल्या इतर बेघर व्यक्ती असल्याचे दिसतो .पण जेव्हा कंटेट क्रिएटर त्याच्याशी बोलण्यास सुरुवात करतो तेव्हा तो भिकारी फाडफाड इंग्रजीमध्ये उत्तर देतो. संभाषणातून समजते की, बेघर व्यक्ती एकेकाळी एक यशस्वी इंजिनिअर होता, पण आज तो भीक मागून आपले जीवन जगावे लागत आहे. त्याची ही अवस्था कशी झाले याबद्दलही त्याने सांगितले आहे.

हेही वाचा –तब्बल ९० हजारांचे बिल पाहून संतापला ग्राहक! रागाच्या भरात हातोड्याने फोडली ओला इलेक्ट्रिक स्कूटर, Video Viral

भिकाऱ्याने सांगितले की, त्याने बंगळुरूमधील ग्लोबल व्हिलेज आणि जर्मनीतील फ्रँकफर्टसह प्रतिष्ठित ठिकाणी इंजिनिअर म्हणून काम केले आहे. पण त्याच्या आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर त्याच्या आयुष्याला नाट्यमय वळण मिळाले. दुःखाने त्रस्त आणि नुकसानाने खचून तो सामना करण्याचे साधन म्हणून दारूकडे वळला. यानंतर व्यसनाधीनतेच्या आहारी गेला, ज्यामुळे अखेरीस त्याचे करिअर, आयुष्यातील स्थिरता गमावली.

शरथच्या म्हणण्यानुसार, हा माणूस सुरुवातीला जयनगर ८व्या ब्लॉकमधील JSS कॉलेज रोडवर सापडला होता, परंतु इतरांनी काही दिवसांपूर्वी त्याला जयनगरच्या 4थ्या ब्लॉकमध्ये मद्यधुंद अवस्थेत पाहिल्याची माहिती दिली होती. मदत देण्याचे प्रयत्न करूनही त्याने मदत नाकारली.

त्यानंतरच्या माहिती देताना शरथने उघड केले की त्याने त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी एनजीओशी संपर्क साधला होता. पण, फॉलो-अप व्हिडिओंपैकी एका डॉक्टरने स्पष्ट केले की, “पोलिसांच्या सहभागाशिवाय कोणतीही एनजीओ कारवाई करू शकत नाही.”

हेही वाचा – Video : भरधाव कारने आधी स्कुटरला दिली धडक अन् रस्त्यावर फरफटत नेली स्कूटर, उडाल्या ठिणग्या तरी थांबेना शेवटी…

BT स्वतंत्रपणे पोस्टची सत्यता सत्यापित करू शकला नाही. मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता आणि यशस्वी वाटणाऱ्या जीवनातील नाजूकपणा याविषयी चर्चा घडवून आणणाऱ्या या माणसाच्या कथेने सोशल मीडिया वापरकर्त्यांशी एकच खळबळ उडवून दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once an engineer in germany now begging on the streets video of a man who speaks broken english goes viral snk