ऑप्टिकल इल्यूजन हा प्रकार आपली बौद्धीक क्षमता ओळखण्यासाठी आहे. ऑप्टिकल इल्यूजनमधील अनेक फोटो संभ्रमित करणारे असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटोमध्ये ZEBRA या शब्दाच्या असंख्य स्पेलिंग दिल्या आहेत. त्यातील फक्त एक स्पेलिंग बरोबर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरवातीला या फोटोला पाहून तुम्हाला हे इल्यूजन खूप सोपे वाटणार पण नंतर हे तितकेच कठीण वाटेल. तुम्हाला माहित असेल ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी निश्चित वेळ दिला जातो. हे ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी तुम्हाला १० सेकंदाचा वेळ दिला जात आहे.

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये समुद्र दिसतोय का? पण हा समुद्र नाही, एकदा क्लिक करून पाहा

या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे ZBERA हीच स्पेलिंग दिसेल पण तुम्हाला ZEBRA ही खरी स्पेलिंग शोधायची आहे. जर तुम्ही १० सेकंदात या फोटोमधील ZEBRA ही खरी स्पेलिंग शोधाल तर तुमचा आयक्यू लेव्हल खूप चांगला आहे, असे मानले जाते पण जर तुम्ही अजूनही ZEBRA हा खरा शब्द शोधू शकला नाही तर आम्ही हे कोडं सोडवायला तुमची मदत करू. आम्ही एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये आम्ही बरोबर स्पेलिंगला पिवळ्या रंगाच्या डब्यात दाखवले आहे.

(फोटो : लोकसत्ता)

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई? एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…

हा ऑप्टिकल इल्यूजन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकजण हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आहे आणि अन्य लोकांना हे ऑप्टिकल इल्यूजन सोडवण्यासाठी चॅलेंज करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion find out zebra correct spelling puzzle photo goes viral ndj