Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो व्हायरल होत आहेत. ऑप्टीकल इल्यूजनची अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला दोन मुलांना शोधायचे आहे. मात्र ते सहजासहजी सापडणार नाहीत. त्यामुळे तुमच्या मेंदू आणि डोळ्यावर जोर द्या आणि तीक्ष्ण नजरेने फोटो तपासा. कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Spot Two Kids In This picture

५ सेकंदात शोधून दाखवा

तुमच्याकडे फक्त ५ सेकंदाची वेळ आहे. फोटो पाहताच ५ सेकंद सुरू होतील. या वेळेतच तुम्हाला फोटोत लपलेली दोन मुलं शोधायची आहेत. या फोटोत ९९ टक्के लोकांना ५ सेकंदात दोन मुलं शोधण्यात अपयश आले आहे. पण तुम्ही नक्कीच प्रयत्न करून पाहा.

हेही वाचा – VIDEO: गर्लफ्रेंड ऐकायलाच तयार नाही, रागवलेला बॉयफ्रेंड वैतागला अन्…पुढच्याच क्षणी झाला ‘पोपट’

या चित्रात खाल्लेले सफरचंद आहे. या चित्रात दुसरं काहीच नाही. पण या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये दोन मुलं लपून बसली आहेत. या फोटोत तुम्हाला दोन मुलं दिसत आहेत का? पाहा. ज्यांना कुणाला ही मुलं दिसली आहेत, त्यांनी कसं डोकं वापरलं आणि शोधलं, ते प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगू शकतात. पण ज्यांना ही मुलं दिसली नाही. त्यांची ५ सेकंदांची वेळ संपली आहे. ज्यांनी कुणी ही मुलं शोधली आहेत, त्यांनी कसं डोकं वापरलं आणि मुलं शोधली, ते प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगू शकतात.

तुम्ही अजूनही त्या दोन मुलांच्या शोधात असाल तर. काळजी करू नका, आम्ही खालील चित्राद्वारे उत्तर दिले आहे.

Two kids in this picture
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion only 1 with eagle eyes can spot two kids in this optical illusion within 5 seconds srk