AI Generated Photo Puzzle: सोशल मीडियावर आजकाल AI फोटोंचा जबरदस्त ट्रेंड सुरू आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर – जिकडे पाहावं तिकडे AI ने तयार केलेले चेहरे, पोजेस व सुंदर लोकेशन्स. आता मजा अशी की, हे फोटो इतके खरेखुरे वाटतात की, कोणता खरा आणि कोणता बनावट हे ओळखणं कठीण होतं.
आजकाल AI इतक्या वेगानं प्रगत झालंय की, खऱ्या आणि बनावट फोटोंमध्ये फरक करणं कठीण झालंय. अशाच एका भन्नाट कोड्यानं नेटकऱ्यांना गुंतवून ठेवलं आहे. दोन फोटो एकाच मुलीचे… पण एकात दडलेलं आहे AI चं रहस्य. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटो कोड्यानं सगळ्यांचं डोकृं गरगरून गेलं आहे. दिसायला दोन्ही फोटो हुबेहूब एकसारखे… पण यातला एक खरा आणि दुसरा AI जनरेटेड. तुम्ही ओळखू शकता का कोणता खरा आणि कोणता बनावट? १० सेकंद… हो, फक्त १० सेकंद आहेत तुमच्याकडे. दोन फोटो तुमच्यासमोर ठेवले आहेत दिसायला दोन्ही सारखेच; पण यातला एक फोटो १००% खरा आहे, तर दुसरा AI ने तयार केलेला. बघा बरं, तुम्ही ओळखता का?
अशाच एका भन्नाट कोड्याने सध्या नेटकऱ्यांना अक्षरशः गोंधळवून टाकलं आहे. तुम्हाला दोन फोटो दाखवले जातात दिसायला दोन्ही हुबेहूब सारखे. तरुणी तीच, हावभाव तेच, अगदी ड्रेस आणि बॅकग्राऊंडदेखील जवळजवळ तसंच; पण गंमत अशी आहे की, यातला एक फोटो खरा आहे आणि दुसरा AI ने बनवलेला.
मग कोडं तुमच्यासमोर – नेमका AI फोटो कोणता?
तुमच्याकडे आहे फक्त १० सेकंद! होय, अगदी १० सेकंदांत तुम्हाला ओळखायचंय की कोणता फोटो खरा आणि कोणता बनावट.
पहिल्या नजरेत बघितलं, तर दोन्ही फोटो एकदम खरेखुरे वाटतात. कुणी म्हणेल डोळ्यांच्या पापण्यांत गडबड आहे, कुणाला केस थोडे कृत्रिम वाटतील, तर कुणाला बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी ‘ऑफ’ वाटेल. पण खरं सांगायचं, तर AI इतकं अॅडव्हान्स झालंय की, एक नजरेत ही कमाल ओळखणं अवघडच आहे.
बरं, आता तुमच्या लक्षात आलं का? अजूनही विचार करता आहात? अरे वा! मग थांबा… उत्तर खाली दिलंय
उत्तर आहे – पहिला फोटो AI जनरेटेड आहे.
होय, खरा आणि खोटा यात फरक शोधताना तुम्ही गोंधळलाच असाल. पण, इथे ‘हिंट’ होती तिच्या हातातील गुलाबाची फुलं! पहिल्या फोटोमध्ये ती फुलं परफेक्ट दिसतात; पण त्यात जिवंतपणाचा ‘फील’ नाही. AI फुलं तयार करतं; पण त्यात नाजूकता, खऱ्या पाकळ्यांचा जिवंत रंग – हे पकडता येत नाही. दुसऱ्या फोटोमध्ये मात्र गुलाब अगदी नैसर्गिक भासतायत.
तर मित्रांनो, तुम्ही ओळखलं का बरोबर? की AI नं तुम्हालाही चकवलं?
तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या!