Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता जाणून घेणारा खेळ आहे. अनेकांना ऑप्टिकल इल्युजन सोडविणे आवडते. अनेक लोक सोशल मीडियावरील व्हायरल ऑप्टिकल इल्युजन सोडवत असतात; पण काही ऑप्टिकल इल्युजन खूप कठीण असतात.

सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या इल्युजनमध्ये दोन बॉलपैकी कोणता बॉल मोठा आहे, हे विचारले आहे. फोटो पाहून तुम्हाला याचे उत्तर सोपे वाटेल; पण हे इल्युजन जितके सोपे दिसते तितके ते सोपे नाही.

हेही वाचा : कहर! चाहत्याने रक्ताने पत्र लिहून केली ‘ही’ मागणी, धोनी पूर्ण करेल का त्याची इच्छा?

व्हायरल ऑप्टिकल इल्युजन

या व्हायरल ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये तुम्हाला दोन बॉल दिसत आहेत. एक बॉल अगदी जवळ आहे; तर दुसरा बॉल दूरवर आहे. या फोटोवर कोणता बॉल मोठा आहे, असा प्रश्न विचारला आहे.
सुरुवातीला आपल्याला जवळ असलेला बॉल लहान; तर दूरवर असलेला बॉल मोठा दिसेल. त्यामुळे फोटो पाहताच दूरवर असलेला A नावाचा बॉल मोठा असल्याचे सर्वांना वाटते; पण हे खरे उत्तर नाही.

हेही वाचा : “गोकुळात रंग खेळतो श्रीहरी !” वारकऱ्यांनी सादर केली हरि लीला, कोणी कृष्ण बनला तर कोणी सोंगाड्या; पाहा व्हिडीओ

ऑप्टिकल इल्युजनचे उत्तर

जेव्हा आपण हा फोटो उलटा करून बघतो तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सापडते. फोटो उलटा केल्यानंतर दोन्ही बॉल सारख्याच आकाराचे दिसतात. दोघांमध्ये कोणताही बॉल मोठा किंवा लहान दिसत नाही.

सध्या हे ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Optical Illusions या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक ऑप्टिकल इल्युजनचे फोटो शेअर केले जातात.
या ऑप्टिकल इल्युजनवर उत्तर देताना अनेक युजर्सनी A नावाचा बॉल मोठा असल्याचे लिहिले आहे; तर काही युजर्सनी दोन्ही बॉल सारख्याच आकाराचे असल्याचे लिहिले आहे.