King Cobra In Pillow: साप म्हटल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. आणि तेच साप जर घरात सापडले तर त्याहून भीती असते. सापाचे तुम्ही आजवर बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कधी बाईक, कधी कार, कधी चप्पल, कधी सोफा, कधी किचन अशा किती तरी ठिकाणी साप लपून बसल्याची प्रकरण समोर आली आहेत. पण आता तर चक्क एका घरा उशीच्या खाली एक महाकाय कोब्रा लपून बसला होता. राजस्थानमधील कोटा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं, जे ऐकूनच लोक थक्क झाले. या घटनेत एक किंग कोब्रा बेडवरील उशीखाली बसला होता. तिथे झोपण्यासाठी आलेल्या व्यक्तीने उशी काढताच खालून एक महाकाय साप बाहेर आला, यानंतर एकच गोंधळ उडाला. सापाची लांबी ५ फुटांपेक्षा जास्त होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही संपूर्ण घटना राजस्थानमधील कोटा येथील भामाशाह मंडीतील आहे. याठिकाणी एका दुकानात एक साप घुसला आणि बेडवर ठेवलेल्या उशीखाली लपला. दरम्यान याठिकाणी मजूर दुकानात झोपण्यासाठी गेले असता उशीखाली साप असल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला. ते घाबरून तिथून पळून गेले. हा साप साधासुधा नसून भलामोठा कोब्रा होता. मजूरांनी वेळीच कोब्रा पाहिला म्हणून नाहीतर कोब्रा सापाने त्यांच्यावर हल्ला केला असता. दरम्यान यानंतर दुकानातील मजुरांनी स्नेक कॅचरला बोलावलं. ज्याने सापाला पकडून वनाधिकाऱ्याच्या मदतीने जंगलात सुखरूप सोडलं.. या कोब्राची लांबी आणि जाडी पाहून यूजर्स अवाक् झाले आहेत.
पाह व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवरील @vani_mehrotra या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सापाचं नावही घेतलं तरी भल्या भल्या माणसाला घाम फुटतो. साधा बिनविषारी साप पण आपल्या समोर आला तर आपल्या हृदयाचे ठोके चुकतात. पावसाळा असल्यामुळे शेतात, बागेत अगदी घरातही साप, अजगर आढळून येतं आहे.