काळासोबत झपाट्याने बदलणाऱ्या जगात आता माणसे आणि त्यांच्या भावनाही बदलत आहेत. तर काही लोक खऱ्या प्रेमाच्या शोधात दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर अशा मुलीची चर्चा सुरु आहे जी, जी रोज वेगवेगळ्या मुलांना डेट करत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे करत असताना ती कोणाचीही फसवणूक करत नाहीये. त्याचवेळी, ती यासाठी भरमसाठ रक्कम देखील घेत आहे. आणि ही मुलंही आनंदाने पैसे देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाकडून ४६ हजार चार्ज

जपानमध्ये राहणारी एक मुलगी तिच्या काही अटींसह मुलांशी डेटिंग करताना दिसत आहे. मुलीचे नाव किरमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या माहितीनुसार, किर्मी तिच्या प्रत्येक डेटसाठी सुमारे 46 हजारांहून अधिक चार्ज करते. सध्या किरमीच्या या कामाला गर्लफ्रेंड ऑन रेंट म्हटले जात आहे.

१० लाखांहून अधिक कमाई

मिळालेल्या माहितीनुसार, जपानचा रहिवासी असलेला किर्मी सध्या मेक्सिकोमध्ये राहत आहे. सोशल मीडियावर तिचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. किर्मी एका महिन्यात १० लाख रुपयांच्या जवळपास कमवत आहे. किर्मीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला तिच्यासोबत जास्त वेळ घालवायचा असेल तर त्याला त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात.

शारिरिक संबंध नाही

किरमी सांगतात की तिने डेट करताना काही नियम केले आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती डेटिंग करताना कोणाशीही शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. यासोबतच ती मुलांसोबत शॉपिंग करण्यापासून ते डेटिंगदरम्यान चित्रपट पाहण्यापर्यंत जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pay and make me a girlfriend young womans open offer earning lakhs of rupees in a month srk