जंगल सफारीचा अनुभव हा प्रत्येकासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचे असते. खरं तर, लोक जंगलात जाऊन धोकादायक प्राणी बघायला खूप घाबरतात. पण तरीही ते जंगल सफारी करतात. कारण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे जीवन जवळून पाहायला मिळते. मात्र, सफारीदरम्यान काही हिंस्र प्राणी वाहनाजवळ येऊन उभे राहून माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जंगलाच्या मधोमध सफारी थांबल्यावर लोकांनी जंगलाच्या अप्रतिम दृश्याचे व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. मात्र, आपण एखाद्या धोकादायक प्राण्याशी सामना करणार आहोत याची त्यांना कल्पना नव्हती.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सिंहीण अचानक सफारीमध्ये घुसते. सिंहिणीला पाहून सुरुवातीला काही लोक घाबरले. मात्र, त्यानंतर सिंहीण त्यांना चाटू लागली, सिंहिणीने कुणालाही इजा करण्याचा प्रयत्न केला नाही. सफारीत बसलेल्या सर्वांना ती प्रेमाने आणि मिठीत घेऊ लागली. लोक त्याचा व्हिडिओ बनवतानाही दिसत आहेत.
थरारक Video पाहून अंगावर येईल काटा
जणू ती सिंहीण नसून पाळीव प्राणी आहे असे वाटत होते. सफारीत बसलेले सर्वजण हसत हसत सिंहीणीच्या सहवासाचा आनंद घेत होते. व्हिडिओ पाहून असे दिसते की ही सिंहीण पाळीव होती, म्हणूनच तिने लोकांवर हल्ला केला नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: मध्यरात्री भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडने चक्क कुलरमध्ये लपवलं; घरच्यांनी पकडलं अन्…
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @rave_ent अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.